Thursday, October 30, 2025

शासनाच्या दुहेरी योजनांचा लाभ ….नगर जिल्ह्यातील दीड लाख लाडक्या बहिणीच्या खात्यांची पडताळणी सुरू

नगर जिल्ह्यातील लाडकी बहिण योजनेत पात्र असणार्‍या आतापर्यंत शासकीय अर्थसहाय घेणार्‍या सव्वा लाख महिलांची यादी राज्य सरकारकडून महिला बालकल्याण विभागाला पाठवण्यात आली आहे. या यादीची पुढील आठ दिवसात पडताळणी करून अन्य शासकीय योजनांसह लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता की नाही, याची खातरजमा करण्यात येत असल्याची माहिती महिला बालकल्याण विभागाच्या दिली.दरम्यान, यासह प्रादेशीक परिवहन कार्यालयाकडे 25 हजार महिलांची यादी या पूर्वीच पडताळणीसाठी देण्यात आलेली असून चार चाकी वाहन नावावर असताना ही संबंधित महिलांनी लाडकी बहिण योजनेत आर्थिक लाभ घेतला असल्याचा संशय सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे या लाडक्या बहिणींसह आता 18 वर्षाखालील व 65 वर्षापेक्षा अधिक वय असणार्‍या शासनाच्या अन्य योजनांसह लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत असलेल्या सव्वा लाख महिलांची पडताळणी करण्यात येत असल्याचे महिला बालकल्याण विभागाकडून सांगण्यात आले.

याबाबत महिला बालकल्याण विभागाच्या मुख्य सचिवांकडून नगर जिल्ह्यातील सव्वा लाख महिलांची यादी नगरला पाठवण्यात आली असून आलेल्या यादीनूसार तालुकानिहाय गाव पातळीवर अंगणवाडी सेविका, महसूल विभागाचे कर्मचारी आणि तालुका पातळीवर महिला बालकल्याण अधिकारी यांच्या पातळीवरून या सव्वा लाख महिलांची खाते तपासणी सुरू करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात ही तपासणी पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे महिला बालकल्याण विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

जिल्ह्यात दीड लाख संशयित बहिणी
नगर जिल्ह्यात चार चाकी वाहन नावावर असणार्‍या 25 हजार आणि आता अन्य शासकीय योजनांसह लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणार्‍या महिलांची शोधाशोध सुरू करण्यात येत आहे. नगर जिल्ह्यात सप्टेंबर 2024 मध्ये लाडकी बहिण योजनेची घोषणा केल्यानंतर 11 लाख 50 हजार महिला योजनेत पात्र ठरवण्यात आल्या होत्या. या सर्वांना आतापर्यंत नियमितपणे लाडकी बहिण योजनेत शासनाच्यावतीने महिन्याला दीड हजारांची आर्थिक मदत देण्यात येत आहे. मात्र, यातील दीड लाख महिलांबाबत आता सरकारकडून संशय व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे त्यांंची खाते तपासण्यात येत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles