‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर पती-पत्नीचा हटके डान्स ; व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

 

सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडीओ आपण दररोज पाहतो. ज्यातील बऱ्याच व्हिडीओंमुळे आपले मनोरंजन होते. पण, अनेकदा रील्सच्या नावाखाली अश्लील डान्सचे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहून युजर्स प्रचंड संताप व्यक्त करताना दिसतात. लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. पण, अनेकदा काही लोक त्यांच्या साधेपणामुळेदेखील लोकप्रिय होतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक कपल सुंदर डान्स करताना दिसत आहे.

नृत्य ही एक खूप सुंदर कला आहे; परंतु आजकाल काही लोक या कलेचा अपमान करताना दिसतात. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी काही जण मुद्दाम अश्लील पद्धतीचे नृत्य करतात. पण आता असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यातील डान्स पाहून तुम्हीही त्यांचे कौतुक कराल.

हल्ली कपल डान्स सर्रास सर्व कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळतात. लग्न सोहळा असो किंवा इतर कुठलाही कार्यक्रम असो, लोक आपल्या जोडीदारासह आवर्जून ठेका धरतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक कपल हटके पद्धतीने डान्स करताना दिसत आहे, जे पाहून युजर्सही कौतुक करताना दिसत आहेत.

 

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सर्वजण नाचत असून यावेळी एका पती-पत्नीच्या जोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @official_photographer_3 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles