Friday, February 20, 2026

डोक्यावर भलंमोठं ओझे घेऊन महिलेचा भन्नाट डान्स; स्टेप्स पाहून थक्क व्हाल , व्हिडीओ

आजकाल सोशल मीडियावर कोण, कधी, कशामुळे व्हायरल होईल याचा काही नेम नाही. काही लोक वेगवेगळे स्टंट करून लोकांचे लक्ष वेधून घेतात, तर काही अचानक केलेल्या डान्सने सोशल मीडियावर प्रसिद्ध होतात. अशाच एका महिलेचा व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या डोक्यावर मोठे ओझे घेऊन रस्त्यावरून चालत जाते आणि त्याच वेळी जबरदस्त डान्स करून सगळ्यांना थक्क करते.

तिची एनर्जी, तिचा आत्मविश्वास पाहून लोक अक्षरशः खुश झाले आहेत. म्हणूनच म्हणतात इंटरनेटची दुनिया आहे, इथे कोण कधी स्टार बनेल याचा काही नेम नाही. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर sandhaya_rajput55 या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. सुरुवातीला असे वाटते की, महिला कदाचित शेतातून पीक कापून परत घराकडे निघाली आहे. तिच्या डोक्यावर मोठे, जड असे पोते असल्याचे दिसते; पण अचानक गाणं लागताच ती रस्त्यातच नाचायला सुरुवात करते. तिचा डान्स, तिची चाल आणि ती सांभाळत असलेला तोल पाहून पाहणारे आश्चर्यचकित होतात

व्हिडीओ चालू झाल्यानंतर पहिल्या क्षणात महिला अगदी साध्या ग्रामीण पेहरावात चालताना दिसते; पण जशी ती थांबते आणि नाचायला लागते, तसा संपूर्ण सीन बदलून जातो. तिच्या डोक्यावर प्रचंड वजन असतानाही ती इतक्या जोरात, एवढ्या स्टाईलने डान्स करते की, पाहणारे विसरून जातात की, ती काहीतरी जड उचलून चालली आहे.तिचा डान्स बघताना एक गोष्ट खास जाणवते आणि ती म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचे हसू व आत्मविश्वास. तिच्या डोक्यावरील पोते जड असूनही तिचा तोल एकदाही ढळत नाही आणि तिच्या डोक्यावरील पोतेही खाली पडत नाही. तिच्या हावभावात आणि स्टेप्समध्ये एक नैसर्गिक मजा आहे, जणू ती आपल्या दैनंदिन जीवनातील थकवा दूर करण्यासाठी नाचतेय.

हा व्हिडीओ आतापर्यंत १.८३ लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे आणि सात हजारांपेक्षा अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. प्रतिक्रियांमध्येही लोक तिच्या डान्सची मोठी स्तुती करीत आहेत. एखाद्याने मजेत लिहिले, “माझं तर काही न उचलतापण बॅलन्स बिघडतो आणि ही बाई इतकं वजन घेऊन नाचते!” तर दुसऱ्याने भावनिक दृष्टिकोनातून लिहिले, “हा फक्त डान्स नाही,; स्ट्रगलमध्येही आनंद शोधण्याची कला आहे.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles