अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विकास गीते तर व्हा. चेअरमनपदी उषा वैराळ यांची बिनविरोध निवड
सभासदांच्या मुलामुलींचे लग्न,आरोग्य, शिक्षण यासाठी कर्ज मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला जाणार- चेअरमन विकास गीते
नगर : अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विकास गीते व उपाध्यक्षपदी उषाताई वैराळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली, नवीन पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची सभा जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी चेअरमन पदासाठी विकास गीते व उपाध्यक्ष पदासाठी उषाताई वैराळ यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाले, चेअरमन पदासाठी बाळासाहेब पवार व सोमनाथ सोनवणे तर उपाध्यक्ष पदासाठी अजय कांबळे व विजय कोतकर सूचक व अनुमोदक होते यावेळी मा. चेअरमन बलराज गायकवाड, मा. व्हाईस चेअरमन बाळासाहेब गंगेकर, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर, सतीश ताठे, श्रीधर देशपांडे,कैलास चावरे, गुलाब गाडे, किशोर कानडे, संचालिका प्रमिला पवार, कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी आदी संचालक उपस्थित होते
नवनिर्वाचित चेअरमन विकास गीते म्हणाले की, मनपा कर्मचारी पतसंस्थेला १०० वर्षाची उज्वल परंपरा असून संचालक मंडळांनी मला चेअरमन पदावर काम करण्याची संधी दिली त्या संधीच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन सभासद हिताचे निर्णय घेतले जातील, सभासदांच्या मुलामुलींचे लग्न तसेच आरोग्य, शिक्षण यासाठी तातडीने कर्ज मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, चांगल्या कामाच्या माध्यमातून संस्थेच्या नावलौकिकात भर घालण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल असे ते म्हणाले
व्हा.चेअरमन उषा वैराळ म्हणाल्या की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला संचालक मंडळांनी व्हा. चेअरमन पदावर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते व मिळालेल्या संधीच्या माध्यमातून पतसंस्थेचा पारदर्शक कारभार केला जाईल अशा त्या म्हणाल्या
पतसंस्थेचे कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी यांनी सर्वांचे स्वागत केले


