Wednesday, March 11, 2026

अजितदादांची भेट राहून गेली, पण…नगर जिल्ह्यातील चौथीचा विद्यार्थी विराज सासवडेची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी भेट

दुर्गम भागातील विद्यार्थ्याचे स्वप्न साकार – विराज सासवडेची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी भेट
पारनेर (प्रतिनिधी) :
दुर्गम व ग्रामीण भागातील धोत्रे खुर्द जि.प.प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीचा विद्यार्थी विराज सुभाष सासवडे याने आपल्या सुंदर हस्ताक्षराच्या जोरावर जिल्हा स्तरावर पुन्हा एकदा प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे त्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले असून त्याची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी भेट घडून आली.
यापूर्वीही विराज सासवडे याने हस्ताक्षर स्पर्धेत जिल्हा स्तरावर क्रमांक मिळवला होता. त्या वेळी पारनेरचे आमदार मा. काशिनाथ दाते यांनी विराजचे हस्ताक्षर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यापर्यंत पोहोचवले होते. विराजच्या सुंदर हस्ताक्षराचे कौतुक करत अजितदादांनी विद्यार्थी विराज सासवडे व त्याचे शिक्षक सचिन ठाणगे यांना भेटीचे आमंत्रण दिले होते. मात्र दुर्दैवाने ही भेट होण्यापूर्वीच अजितदादा आपल्यातून गेल्याने ती भेट अपूर्ण राहिली होती.
दरम्यान, यावर्षीही विराज सासवडे याने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्यानंतर आमदार काशिनाथ दाते यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट विराजला घडवून आणण्यात आली.
या भेटीत सुनेत्रा पवार यांनी विराजच्या सुंदर हस्ताक्षराचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण विराज सासवडेने घालून दिले आहे.
विराजच्या या यशामुळे धोत्रे खुर्द गावासह जि.प. शाळेत आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या भेटी प्रसंगी व्य . स . अध्यक्ष बाळासाहेब नाईकवाडी पालक सुभाष सासवडे पंढरीनाथ तागड जयदीप ठाणगे उपस्थित होते

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles