विराट कोहली आणि अनुष्का शर्मा म्हणजे, टॉप सेलिब्रिटी कपल्सपैकी एक.
प्रसिद्धीपासून आणि माध्यमांच्या कॅमेऱ्यांपासून कुटुंबीयांसोबत वेळ घालवता यावा, यासाठी दोघेही अनेकदा लंडनवारीही करतात. मध्यंतरी तर विराट, अनुष्का लंडनला शिफ्ट होणार अशाही अफवा पसरलेल्या. पण, तेवढ्यात दोघांच्या अलिबागच्या घराबाबत चर्चा समोर आल्या. सेलिब्रिटी कपलनं अलिबागमध्ये व्हेकेशन होम बांधलंय. विरुष्काच्या आलिशान लक्झरी होमची किंमत तब्बल 32 कोटी रुपये आहे. तब्बल 10 हजार चौरस फुटांमध्ये विराट-अनुष्कानं लक्झरी हाऊस उभारलं आहे.
आर्किटेक्चरल डायजेस्ट इंडियामधील एका अहवालानुसार, विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं व्हेकेशन हाऊस फिलिप फौचे यांच्या स्टीफन अँटोनी ओल्मेस्डाहल ट्रुएन आर्किटेक्ट्स (SAOTA) यांनी डिझाइन केलंय. जानेवारी 2025 च्या मिंटच्या अहवालानुसार, 10 हजार चौरस फुटांवर पसरलेल्या व्हिलाची किंमत 32 कोटी आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विराट आणि अनुष्का यांच्या घराची झलक दाखवण्यात आलीय. विरुष्काचं हे आलिशान घर पाहून थक्क व्हायला होतं. दोघांच्या लक्झरी घरात शानदार सजावट करण्यात आलीय. टेम्परेचर कंट्रोल पूल, एक खास किचन, चार बाथरुम, एक जकूजी, मोठा बगिचा असं बरंच काही विरुष्काच्या लक्झरी घरात आहे.


