अहमदपूर ते मंत्रालय पायी वारी, शेतकरी नांगर घेऊन पोहचला अहिल्यानगरपर्यंत
शेतकऱ्यांच्या खांद्यावरील जू कधी निघणार, शेतकरी सहदेव होनाळेंचा सवाल
खासदार निलेश लंके यांनी घेतली शेतकऱ्याची भेट
धानोरा (बु) येथील शेतकरी सहदेव होनाळ े हे शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी अहमदपूर ते मंत्रालयापर्यंत पायी निघाले आहेत. आज ते अहिल्यानगर येथे पोहोचले असून रस्त्यामध्ये विविध ठिकाणी त्या- त्या भागातील शेतकऱ्यांनी त्यांना भेटून त्यांच्या मागण्याच्या समर्थन केले आहे. तर अहिल्यानगर ते पोहोचल्यानंतर या शेतकऱ्याचे खासदार निलेश लंके यांनी भेट घेतली आहे. यावेळी त्या शेतकऱ्याचे विचारपूस करत त्याला पाठिंबा निलेश लंके यांनी दिला आहे
या आहेत प्रमुख मागण्या
* शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करावा. • योग्य भाव मिळावा यासाठी भावांतर योजना लागू करावी. • पीएम किसान सन्मान निधी योजनेत वाढ करून शेतकऱ्यांना अधिक आर्थिक आधार द्यावा. • एक रुपया पीक विमा योजना आण ि मिड-सिझन पीक विमा योजना पुन्हा सुरू करावी. • नाफेडमार्फत ऑनलाइन नोंदणी करूनही सोयाबीन खरेदीन झालेल्या शेतकऱ्यांना फरकाची रक्कम तातडीन े द्यावी, आदीमागण्या केल्या.


