Saturday, February 21, 2026

अहिल्या नगर महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्याप्रभाग रचनेला वेग

अहिल्यानगर-महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेच्या कामाला सुरूवात झाली आहे. जनगणना, प्रगणक गटांची माहिती घेतल्यानंतर समितीकडून स्थळ पाहणी करण्यात आली आहे. आता गुगल मॅपव्दारे नकाशे तयार करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. येत्या 24 जुलैपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेचा संपूर्ण मसुदा तयार होणार आहे.
राज्य शासनाने जारी केलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार प्रभाग रचनेचे काम सुरू झाले आहे. उपायुक्त विजयकुमार मुंडे, नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक स्नेहल यादव यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचार्‍यांच्या समितीमार्फत प्रभाग रचना तयार केली जात आहे.

सन 2011 च्या जनगणनेची व प्रगणक गटांची माहिती घेऊन त्यानुसार स्थळ पाहणी करण्यात आली. त्यानुसार आता येत्या पाच दिवसात गुगल मॅपव्दारे नकाशे तयार करण्यात येणार आहेत. नकाशातील दर्शविलेल्या हद्दीवर जाऊन पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी झाल्यानंतर प्रभागांची सीमा निश्चित करून प्रभागाच्या व्याप्तीसह प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा 24 जुलैपर्यंत तयार केला जाणार आहे.

दरम्यान, महापालिकेने केलेला प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा जिल्हाधिकारी व आयुक्तांमार्फत नगरविकास विभागाकडे सादर केला जाणार आहे. तेथून तो राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे. आयोगाच्या मान्यतेनंतर 3 सप्टेंबरला महापालिका आयुक्तांमार्फत प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात येणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles