अहिल्यानगर शहराचा पाणी पुरवठा होणार विस्कळीत
महावितरणकडून शनिवारी (ता. २६) शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारपासून सलग तीन दिवस अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती भाग व उपनगरातील पाणीपुरवठा एक दिवस विलंबाने होणार आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.महावितरण प्रशासनाकडून वृक्षांच्या फांद्या तोडणे, विद्युत यंत्र सामुग्रीची देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी शनिवारी (ता. २६) सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत शटडाऊन घेण्यात येणार आहे.
दुरुस्ती कामे करण्यात येणार
 या कालावधीत महापालिकेकडून शहर पाणी योजनेवरील दुरुस्ती कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे अहिल्यानगर शहारातील मध्यवर्ती भाग व उपनगरातील ज्या भागात शनिवारी (ता. २६) पाणी पुरवठा होणार आहे तेथे रविवारी (ता. २७), रविवारी (ता. २७) पाणी पुरवठा होणाऱ्या भागाला सोमवारी (ता. २८) व सोमवारी (ता. २८) पाणी पुरवठा होणाऱ्या भागाला मंगळवारी (ता. २९) पाणी पुरवठा होईल.


