Saturday, February 21, 2026

सरकारचं टेन्शन वाढणार?अपात्र बहि‍णींवर कारवाई केली तर आम्ही न्यायालयात जाऊ, माजी मंत्र्यांचा सरकारला इशारा

लाडकी बहीण योजनेवर अनेक टीका होताना दिसत आहे. विरोधकांकडून लाडक्या बहि‍णींची फसवणूक होत असल्याचे बोलले जात आहे. लाडकी बहीण योजनेतून आता ५० लाख महिला अपात्र केल्याचा आरोप दिला जात आहे. त्यावर आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडून यांनी टीका केली आहे. लाडक्या बहि‍णींची फसवणूक होत आहे आम्ही न्यायालयात जाऊ, असं त्यांनी म्हटलं आहे.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 50 लाखापेक्षा जास्त महिला अपात्र केल्याचा आरोप केला जात आहे..ही सगळी लाडक्या बहिणींची फसवणूक आहे या विरोधात आम्ही कोर्टात पण जाणार आहे, निवडणुकीत पात्र अपात्र न पाहता मतं घेण्यासाठी केलेला हा प्रकार आहे. एकदा पात्र-अपात्रची सर्व कारवाई झाली की तेव्हा अपात्र महिलांना सोबत घेऊन आम्ही कोर्टात जाऊ.अपात्र महिलांना लाभ दिला कसा दिला असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तर एकदा सरकारने अपात्र पात्र याची यादी दिल्यावर आम्ही कोर्टात जाऊ असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं.

लाडकी बहीण योजनेवर विरोधी पक्ष नेहमीच टीका करतात. लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन देऊन त्यांना पैसे दिले नाही, त्यांची फसवणूक केली जात आहे, असं विरोधी पक्षांनी म्हटलं आहे. लाडकी बहीण योजना बंद होईल, असंही अनेकांनी म्हटलं आहे. मात्र, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असं स्वतः मंत्री आदिती तटकरेंनी सांगितलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles