Thursday, March 19, 2026

अवकाळीचे सावट ;पुढील दोन दिवस राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा

राज्यात उन्हाचा चटका जाणवत असतानाच आता हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल झाले आहेत. हवामानतज्ज्ञ सानप यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, पुढील दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. सध्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागांत मोठ्या प्रमाणावर ढगांची गर्दी पाहायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा घसरला असून, विशेषतः सायंकाळच्या वेळी हवेत सुखद गारवा अनुभवायला मिळत आहे. कडाक्याच्या उन्हापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अवकाळी पावसाचे संकट मात्र गडद झाले आहे

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ढगाळ हवामानामुळे पुढील ४८ तासांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या गारपिटीची देखील शक्यता आहे. मात्र, हा दिलासा अल्पकाळ टिकणारा असून, दोन-तीन दिवसांनंतर वातावरणात पुन्हा बदल होईल आणि तापमानात मोठी वाढ होऊन उन्हाचा कडाका वाढेल. अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या शक्यतेमुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची आणि फळबागांची योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये २० मार्चपर्यंत दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. १८ ते २० मार्च दरम्यान वादळी पावसाची तीव्रता आणि क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. या काळात विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊ शकते. २१ मार्चपासून हवामान स्थिर होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे

या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान, द्राक्ष, गहू, ज्वारी, आंबा फळपिके यांचे नुकसान झाले आहे. जतच्या डफळापुर परिसरामध्ये सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यावेळी काही ठिकाणी गारा ही पडल्या. राज्यात पुढील काही दिवस पावसाचे ढग कायम असणार आहेत. त्यामध्येच अनेक भागात मोठ्या प्रमाणात गारपिट होत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles