Friday, February 20, 2026

Video: सप्तपदी सुरू असताना झाला गोंधळ, नवरीबरोबर तीन मैत्रिणी घेतले फेरे…

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास आणि भावनिक क्षण असतो. पण, या आनंदात कधी कधी असं काही घडतं की तो क्षण आयुष्यभरासाठी आनंदी आठवण म्हणून लक्षात राहतो. सोशल मीडियावर सध्या असाच एक मजेशीर लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ना नवरा नवरीचा डान्स आहे, ना वाद..तरीही सर्वजण पोट धरून हसत आहेत. तर या व्हिडीओमध्ये आहे निस्वार्थ मैत्री आणि मैत्रिणीची अति काळजी, जी मंडपात सर्वांना हसण्यास/ हसायला भाग पाडते.

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नसोहळ्यातील आहे. नवरी आणि नवरदेव पारंपरिक पद्धतीने फेरे घेत असतात. नवरीने घातलेला जड लेहेंगा, दागिने आणि संपूर्ण लूक पाहता तिला चालताना थोडा त्रास होत असल्याचं दिसतं. ही अडचण पाहून तिच्या तीन जिवलग मैत्रिणी तिला मदत करण्यासाठी थेट मंडपात येतात आणि इथूनच सुरू होते खरी मज्जा.

नवरीचा लेहेंगा उचलताना मैत्रिणी इतक्या गुंग होतात की त्या नकळत नवरी आणि नवरदेवाबरोबर फेरे घ्यायला लागतात. क्षणभर लोकांना वाटतं नक्की लग्न कोणाचं सुरू आहे. व्हिडीओ शूट करणारी एक मुलगी मागून आवाज देते, “अगं फेरे फक्त नवरी आणि नवरदेवाने घ्यायचे असतात. हे ऐकताच नवरी, मैत्रिणी आणि मंडपातले सगळेच जोरजोरात हसायला लागतात. संपूर्ण वातावरण क्षणात हलकंफुलकं होतं. जणू लग्न नाही तर मैत्रिणींची पिकनिकच सुरू आहे असा फिल येतो.


आजकाल जिथे लग्नांमध्ये ताणतणाव, ड्रामा किंवा रडारड दिसते, तिथे हा व्हिडीओ खरी मैत्री, निरागसपणा आणि मनमोकळा आनंद दाखवतो; त्यामुळेच हा व्हिडीओ लोकांच्या मनाला भिडतोय. तुमच्याही आयुष्यात अशी मैत्रीण असेल तर हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही ती नक्की आठवेल!

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles