खोलीत एसीचं टेंपरेचर… नवरदेवानं नवरीकडून घेतलं असं ‘आठवं वचन’….पाहा व्हिडिओ

लग्न म्हटलं की, आनंद, गोंधळ, हास्य आणि प्रेमाने भरलेला प्रत्येक क्षण खास बनतो. अशाच एका दिल्लीतील लग्नात नवरदेव-नवरीच्या गमतीदार संवादामुळे एक मजेशीर प्रसंग घडला आणि तोच क्षण सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पारंपरिक सात वचनांच्या पलीकडे जाऊन नवरदेवानं घेतलेलं ‘आठवं वचन‘ ऐकून पाहुण्यांना हसू आले

दिल्लीतील एका लग्नात नवरदेवानं नवरीकडे केलेली एक मजेदार मागणी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अग्नीपुढे घेतल्या जाणाऱ्या पारंपरिक सात वचनांव्यतिरिक्त नवऱ्यानं अचानक ‘आठवं वचन‘ मागितलं आणि ते ऐकताच सगळे पाहुणे टाळ्या वाजवून हसू लागले. लग्नातल्या या गमतीशीर क्षणाचा व्हिडीओ लाखोंनी पाहिला असून, लोक त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.हा व्हिडीओ दिल्लीतील मयंक आणि दिया यांच्या लग्नातील मजेदार प्रसंगाचा आहे. लग्नाचे पारंपरिक विधी सुरू असताना नवऱ्यानं अचानक आणखी एक ‘आठवं वचन‘ घेणार असल्याची घोषणा केली. व्हिडीओमध्ये नवरदेव-नवरी स्टेजवर बसलेले दिसतात. नवरदेव हसत म्हणतो, “मी तिच्याकडून एक वचन घेणार आहे… स्वीकार आहे, असं तिच्याकडून बोलून घ्या. नंतर नाही म्हणायच नाही.”

नवऱ्याचं ते बोलणं ऐकताच आजूबाजूचे लोक उत्सुकतेनं बघू लागतात. मग तो आपलं ‘आठवं वचन‘ सांगतो, खोलीत एसीचं टेंपरेचर मी सेट करणार!” हे ऐकताच नवरीसह सगळे पाहुणे जोरात हसू लागतात. नवरीही हसत म्हणते, “स्वीकार आहे!” हा गमतीशीर संवाद एका क्षणातच सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरवतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles