पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडणं म्हणजे एखादं टीव्ही सिरियलचं ड्रामा वाटावं असं झालंय आहे. पण असा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे, जिथेनवऱ्यानं दोघांना पकडलं आणि थेट रस्त्यावरच लग्न लावून दिलं. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या घटनेत तुम्ही पाहु शकता, एक चारचारी वाहनातून पती आपल्या पत्नीला बाहेर काढत आहे. धक्कादायक म्हणजे तिच्यापाठी मागे तिचा प्रियकर असतो जो तिच्यापाठी मागून बाहेर येतो. त्यानंतर जो पती असतो तो न रागवता किंवा हाणामारी न करता पत्नीच कपाळावरील कुंकु पाण्याने धुवून टाकतो.
कुंकु पुसून टाकल्यानंतर पत्नीच्या प्रियकराच्या हातात नवीन कुंकु देतो आणि थेट भररस्त्यातच तिच्या कपाळावर लावण्यास सांगतो. सर्व घडलेला प्रकार एक व्यक्ती मोबाईलमध्ये शुट करताना दिसत आहे. मात्र, पत्नी तिचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करते. सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून अनेक प्रतिक्रिया नेटकरी वर्गातून मिळत आहेत.
सर्व प्रकार नक्की कुठला आहे ते अद्याप समजले नाही. पण हा व्हिडिओ एक्सवरील @gharkekalesh या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. एका यूजरने म्हटलं की,”चला बाबा दुसऱ्या लग्नाचा खर्च वाचला” दुसऱ्या यूजरने म्हटलं,”देवा काय पाहाव लागल त्या नवऱ्याला” तर तिसऱ्या यूजरने म्हटलं,”एक खानाखाली देयला पाहिजे होती दोघांच्या” अशा प्रकारे संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप: नवरा-बायकोचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.


