Wednesday, October 29, 2025

अहिल्या नगर शहरात महापुरुषाबद्दल आक्षेपार्ह लिखाण कार्यकरणाऱ्याला अटक

महापुरुषांबद्दल आक्षेपार्य शब्द लिखाण करणाऱ्या इसमाच्या अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासात मुसक्या आवळल्या.

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, कोतवाली पोस्टे गुरनं 902/2025, भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 353(2), 356(2), 352 प्रमाणे गुन्हे दाखल झाला असता, सदर गुन्हयातील आरोपीची माहिती काढुन, गुन्हा उघडकीस आणणेबाबत मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आदेश दिले. त्यानुसार पोनि किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/ दिपक मेढे, श्रे.पोउपनि/ राजेंद्र वाघ, पोहेकॉ/ शाहिद शेख, पोहेकॉ/ सुनिल पवार, पोहेकॉ/ अतुल लोटके, पोहेकॉ/ दिपक घाटकर, पोहेकॉ/ सुयोज सुपेकर, पोहेकॉ/ फुरकान शेख, पोकॉ/ सागर ससाणे, पोकॉ/ अमृत आढाव, पोकॉ/ योगेश कर्डील, पोकॉ/ प्रशांत राठोड, पोकॉ/ प्रमोद जाधव यांचे दोन विशेष पथके तयार करुन, सदर पथकास सुचना व मार्गदर्शन करुन, पथके रवाना करण्यात आलेली होती.
नमुद पथकांनी गोपनिय माहिती व व्यावसायिक कौशल्याचे आधारे माहिती काढुन, नमुद गुन्हयातील आरोचा अहिल्यानगर शहरात विविध ठिकाणी शोध घेतला. नमुद आरोपी वेषांतर करुन फिरत असतांना, मोठया शिताफिने आरोपी नामे फरीद सुलेमान खान, वय 30 वर्षे, राहणार आलमगिर, भिंगार, ता.जि. अहिल्यानगर याला ताब्यात घेऊन, त्यांचेकडे गुन्हयाबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता, त्यांनी गुन्हा केल्याचे सांगितले आहे.
सबब, ताब्यात घेतलेला आरोपी नामे फरीद सुलेमान खान, वय 30 वर्षे, राहणार आक्सा मंझिद जवळ, आलमगिर, भिंगार, ता.जि. अहिल्यानगर यांस कोतवाली पोस्टे गुरनं 902/2025, भारतीय न्याय संहीता कलम 353(2), 356(2), 352 प्रमाणे दाखल गुन्हयाचे पुढील तपास कामी कोतवाली पो.ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास चालु आहे.
सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर श्री. दिलीप टिपरसे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अहिल्यानगर शहर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles