आर्किटेक्ट इंजि. अँड सर्व्हेअर्स असोच्या वतीने एमइपीएफ डिझाईन व बिल्डिंग सर्व्हिसेससाठी समन्वय या विषयावर कार्यशाळा संपन्न
अहिल्यानगरमध्ये मोठ्या गृह प्रकल्पांसाठी एम इ पी कन्सल्टंट यांची भूमिका आगामी काळात महत्वाची ठरणार – अनिकेत नानकर
नगर ; अहिल्यानगरमध्ये मोठ्या गृह प्रकल्पांसाठी एम इ पी कन्सल्टंट यांची भूमिका आगामी काळात महत्वाची ठरणार फ्लोनेट कंपनी मेकॅनिकल, प्लंबिंग, फायर फायटिंग, इलेक्ट्रिक डिझाईन, बिम समन्वयक या सर्व्हिसेस मध्ये प्रकल्पात समन्वयकाचे काम पाहत असल्याचे सांगून मेकॅनिकल मध्ये ए सी सिस्टिमचे प्रकल्पात योग्य डिझाईनसाठी आणि प्लॅन प्रमाणे ते जागेवर कार्यान्वयित करण्याचे काम पाहते. तसेच गरजेप्रमाणे ए सी सिस्टिम डिझाईन, हिट लोड डिझाइन, पार्कींग मधील लाईन डिझाईन या गोष्टी येतात. इलेक्ट्रिक सिस्टिम डीझाईन मध्ये इलेक्ट्रिक लोड कॅल्क्युलेशन, पॉवर सप्लाय, अर्थिंग, जनसेट बॅक अप, पॉवर डीस्ट्रिब्युशन डीझाईन याचा अभ्यास करावा लागतो. प्लंबिंग मध्ये वॉटर डिमांड कॅल्क्युलेशन, वॉटर व ड्रेनेज वॉटर डीस्ट्रिब्युशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाईपिंगआणि पंप डिझाईन, डिटेल स्पेसिफिकेशन व बिल क्वांटिटी काढाव्या लागतात. फायर फाईटिंग सिस्टीम डीझाईन मध्ये फायर स्प्रिंकलर सिस्टिम, फायर अलार्म, पंप रूम डीझाईन, डिटेल स्पेसिफिकेशन व बील क्वांटिटी काढणे या गोष्टींचा अंतर्भाव होतो. एम इ पी सर्व्हिसेस मध्ये आर्किटेक्चरल, स्ट्रक्चरल, इंटेरियर सिस्टीम तसेच बिल्डिंग आणि साईट सर्व्हीसेसचा अंतर्भाव असतो. मोठ्या प्रकल्पात एम इ पी सर्व्हिसेस घेतल्याने प्रोजेक्ट वेळेत आणि नियोजपूर्वक पूर्ण होणे, अनावश्यक चुका टाळणे , वापरकर्ता यांना योग्य उपभोग आणि सुरक्षितता बहाल होते. पर्यावरण पूरक बांधकाम झाल्याने एनर्जी बचत होते. असे फ्लो नेट इंजिनीअरिंग सर्व्हिसेसचे अनिकेत नानकर यांनी सांगितले
आर्किटेक्ट इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो आणि एस आर जे स्टील जालना यांच्या संयुक्त विद्यमाने एम इ पी एफ डिझाईन आणि बिल्डिंग सर्व्हिसेस साठी समन्वय या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फ्लोनेट इंजिनीअरिंग सर्व्हिसेस कंपनीचे संचालक नितीन कुंभेकर,अनिकेत नानकर, विशाल सरोटे, एस आर जे स्टील कंपनीचे अविनाश पुरोहित आणि विशाल येसेकर तसेच एसा संस्था अध्यक्ष आदिनाथ दहिफळे, उपाध्यक्ष विनोद काकडे खजिनदार भुषण पांडव, यश शहा, नंदकिशोर घोडके, विजय पादिर, सचिन डागा, संतोष खांडेकर, मयुरेश देशमुख, जितेश सचदेव, प्रितेश कांकरिया, प्रकाश जैन, सतीश कांबळे, सुरेश परदेशी, अशोक मवाळ, राजकुमार मुनोत, संजय पवार आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संचालक नितीन कुंभेकर म्हणाले की, विकासक यांच्या अनावश्यक खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते. एक चांगला एम इ पी कन्सल्टंट व्यक्ती म्हणून काम करताना प्रोजेक्ट सुरुवातीस कन्सल्टंट यांची नियुक्ती करणे, कामास सुरुवात होणेआधी सर्व प्लॅन आणि ड्रॉइंग फायनल असणे, आर्किटेक्ट इंजिनीअर व कॉन्ट्रॅक्टर यांच्या बरोबर योग्य समन्वय तसेच वेळोवेळी कामाचा आढावा घेणे व साइट वर वेळोवेळी देखरेख या गोष्टी आवश्यक आहे , एम इ पी अंतर्गत आपण बंगले, वाणिज्य, रहिवासी, हॉटेल, रिसॉर्ट , प्लॉटिंग, हॉस्पिटल, बिम यांचे काम योग्य रीतीने करू शकतो. त्याच प्रमाणे बिल्डिंग इन्फोरमेशन मॉडेलिंग बिम ही संगणक प्रणाली वापरल्यास कामामध्ये आणखी सुसूत्रता येत असल्याचे नमूद केले.
कार्यक्रम आयोजनात आर्की. मानव निमसे यांचे सहकार्य लाभले. प्रदिप तांदळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर जितेश सचदेव यांनी उपस्थितांचे आभार मानले.


