नगर शहरात क्रिकेटच्या वादातून युवकाला मारहाण ; दोघांविरूध्द गुन्हा दाखल

  अहिल्यानगर- शहरातील पिंजार गल्ली, पीरशहा खुंट परिसरात क्रिकेट खेळताना झालेल्या किरकोळ वादातून एका युवकाला मारहाण करून जखमी केल्याची घटना रविवारी (5 एप्रिल) रात्री घडली. आपान जावेद शेख (वय 18, रा. पिंजार गल्ली, पीरशहा खुंट) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, जखमी आपान याची आई नाजमीन जावेद शेख (वय 36) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अफजान जावेद शेख व झैद जावेद शेख (दोघे रा. पिंजार गल्ली, पीरशहा खुंट) यांच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपान हा आपल्या मित्रांसह आडते बाजार परिसरातील लाईट डीपीजवळ क्रिकेट खेळत होता. त्याचवेळी खेळताना अफजान शेख व झैद शेख यांच्यासोबत त्याचा वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले असून, दोघांनी आपानच्या डोक्यावर लाकडी बॅटने वार केला तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ आपान याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती आहे. आपानची आई नाजमीन यांनी पतीसह कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, अफजान शेख व झैद शेख यांच्याविरूध्द फिर्याद दाखल केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles