शेवगाव शहरात दगडाने ठेचून युवकाची निर्घृण हत्या ; गुन्हा दाखल

शेवगावशहरातील ढाकणे वस्तीजवळील ओढयामध्ये एका युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना शनिवारी (दि. 11) दुपारी 12 ते 3 च्या सुमारास उघड झाली. गणेश दिनकर लांडे (वय 28, रा.सालवडगाव, ता.शेवगाव) असे मृताचे नाव आहे. शेवगाव पोलीस ठाण्यात  खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील ढाकणे वस्तीच्या ओढयाजवळ एक युवक शनिवारी मृत अवस्थेत आढळून आला. परिसरातील नागरिकांनी याबाबत पोलीसांना माहिती दिली.

त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, शाम गुंजाळ, भगवान सानप, संतोष वाघ यांच्यासह पोलीस कर्मचारी व पंचासह घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी परिसरात पाहणी केल्यानंतर त्याच्या शेजारी दगड आढळून आले. त्याच्या डोक्याला व पायाला जखमा आढळून आल्या. पोलीसांनी पंचनामा करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

घातपाताचा संशय असल्याने पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. या घटने संदर्भातील संशयितांना पोलीसांनी तत्परतेने ताब्यात घेतले असून याबाबत कसून चौकशी सुरु आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुटकुळे करीत आहेत. लांडे याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles