Friday, February 20, 2026

अहिल्यानगर संभाजीनार महामार्गावर इमापूर घाटात कंटेनरच्या धडकेत युवक ठार

अहिल्यानगर- संभाजीनार महामार्गावर कंटेनरने दिलेल्या जोरदार धडकेत २३ वर्षीय युवक जागीच ठार झाला. ही घटना महामार्गावरील इमापूर परिसरातील प्रहार ॲकेडमी जवळ घडली. प्रतीक नंदकुमार शिंदे (वय, २३ रा. जेऊर, ता. जि. अहिल्यानगर ) असे मयत युवकाचे नाव आहे.

जेऊर परिसरात वास्तव्यास असणारा प्रतीक कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. कोरोना काळात वडिलांचे छत्र हरपल्यानंतर घरची जबाबदारी पार पडत होता. शिक्षणाबरोबर तो शेती देखील करत होता. ३१ डिसेंबर रोजी प्रतीकने सकाळी शेतीतील कांदे विक्रीसाठी नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे विकीसाठी पाठवले होते.

त्यानंतर प्रतीक देखील दुचाकीने निघाला होता. दरम्यान, इमापूर परिसरातील प्रहार ॲकेडमी जवळ त्याच्या दुचाकीला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, प्रतीक शिंदे याचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. भरधाव वेग आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. कुटुंबाने एकुलता एक आधार गमावल्याने जेऊर ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles