Friday, March 20, 2026

झेडपी आणि महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे होणार

राज्यात मागील काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. तीन वर्षापासून महापालिका आणि जिल्हा परिषदांचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. दरम्यान, या वर्षातच महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. याबाबत सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यात ऑक्टोंबरपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका वेगवेगळ्या होणार आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडून लवकरच वेळापत्रक येऊ शकते.

नगर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समित्यासोबतच 11 नगर 11 नगर पालिकांच्या निवडणूक झालेल्या नाहीत. जिल्हा परिषद- पंचायत समित्या आणि महानगर पालिका तसेच नगर पालिकांच्या निवडणूका स्वतंत्र झाल्यास जिल्ह्यात देखील तीन टप्प्यात निवडणूका होण्याची शक्यता निवडणूक विभागाच्या सुत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. नगर शहरात महापालिका, त्यानंतर संगमनेर, कोपरगाव, राहाता, देवळाली प्रवरा, श्रीरामपूर, राहुरी, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड आणि शिर्डी या ठिकाणी स्वतंत्रपणे तीन टप्प्यात निवडणूका होण्याची शक्यता आहे. अकाले, पारनेर आणि कर्जत नगर पालिकांची मुदत 2027 मध्ये संपणार आहे.

लवकर होवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट आणि गणाच्या निवडणुकीसाठी ग्रामविकास विभागाच्या आदेशानूसार प्रत्येक तालुक्यात प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. तयार करण्यात येणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट आणि गणांची शुक्रवारपासून नगरला तपासणी करण्यात येणार आहे. 27, 28 आणि 30 जून जिल्हाधिकारी कार्यालयात तालुकानिहाय या प्रारूप प्रभागाची रचना तपासून त्यानंतर त्यांची घोषणा करण्यात येणार आहे. यामुळे एका प्रकारे गट आणि गणाची प्रभाग रचना करतांना जिल्हा प्रशासन दक्षता घेतांना दिसत आहे.

दरम्यान, साधारण दिवाळीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. त्याद़ृष्टीने राज्य निवडणूक आयोग आणि ग्रामविकास विभागाच्यावतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी 10 जून रोजी राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने आदेश काढण्यात आले. या आदेशानंतर तयार करण्यात प्रारूप प्रभाग रचनेबाबत ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आदेश काढत निवडणुकीसाठी नव्याने गट आणि गणांची प्रभाग रचना करण्याचे आदेश काढले. दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी 14 जुलैला जिल्हाधिकारी प्रारुप प्रभाग जाहीर करणार आहेत. त्यानंतर 21 जुलैपर्यंत त्यावर हरकती व सूचना सादर करता येणार आहेत. त्यानंतर 28 जुलैपर्यंत प्राप्त हरकतीच्या आधारे अभिप्रायासह जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यात्या विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. त्यानंतर 11 ऑगस्टपर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन निर्णय घेण्यात येणार असून 18 ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा प्राधिकृत केलेल्या अधिकार्‍याकडे सादर करण्यात येणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles