श्रीरामपूर गोळीबार: 2 आरोपींना अटक, 4 फरार साथीदारांचा शोध सुरू

श्रीरामपूर गोळीबार: 2 आरोपींना अटक, 4 फरार साथीदारांचा शोध सुरू

प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 02/07/2026 रोजी दुपारी 01.00 वा. चे सुमारास फिर्यादी व त्याचा मित्र शुभम यादव असे म्हसोबा चौक, पूर्णवादनगर वार्ड नं. 07 श्रीरामपूर येथे बोलत असतांना जुन्या वादाच्या रागातून अभय सुरेश ससाणे याने व त्याचे इतर पाच साथीदारांनी फिर्यादी व जखमी यास लाकडी दांडके व इतर हत्यारांनी मारण्याचा प्रयत्न केला व अभय सुरेश ससाणे याने त्याचेकडील बंदुकीतून शुभम यादव याचेवर गोळी झाडून त्यास गंभीर जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

मा. श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर गुन्ह्यातील आरोपी तात्काळ अटक करणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेस आदेश दिलेले होते.

नमुद आदेशानुसार पो.नि. श्री संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार शाहीद शेख, रिचर्ड गायकवाड, श्यामसुंदर जाधव, सागर ससाणे, रमीजराजा अतार, यांचे पथक तयार करून गुन्ह्यातील आरोपीचे शोध घेऊन तात्काळ अटक करणेबाबत सूचना व मार्गदर्शन करून रवाना केले.

वर नमुद पथकाने वरील गुन्ह्यातील आरोपींची माहिती संकलित करून व्यवसायिक कौशल्याचे आधारे माहिती काढत असतांना पथकास दिनांक 03/07/2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत सदर गुन्ह्यातील आरोपी अभय सुरेश ससाणे हा त्याचे साथीदारासह नाशिक येथे जात असल्याची माहिती मिळाली.

पथकाने तात्काळ नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने नाशिक येथून आरोपी नामे:
1) अभय उर्फ अभी सुरेश ससाणे, वय-21 वर्षे, रा. अजतवाडी, वार्ड नं. 7 श्रीरामपूर जि. अहिल्यानगर
2) अक्षय किरण कपोते, वय-25 वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, वार्ड नं. 07 श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर

यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा जुन्या वादाचे कारणावरून केला असल्याचे सांगितले आहे. तसेच गुन्ह्यातील उर्वरीत आरोपीचे स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचेकडून शोध घेण्याचे काम चालू आहे.

ताब्यातील आरोपी वरील गुन्ह्याचे तपासकामी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कारवाई श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles