आता दुधात भेसळ करणाऱ्यांना, तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; संकलन ते विक्री सर्व टप्प्यावर नियमावली जारी

दूध आणि दुग्धजन्य पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्याप्रकारे हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या बाबतीत सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणेच आता दूध भेसळीच्या विरोधात कठोर पाऊले उचलली जाणार असल्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.

दूध भेसळीबाबतचे नवे नियम हे दूध उत्पादकापासून ते ग्राहकापर्यंत सर्वांना लागू असतील, असेही मुंढे यांनी स्पष्ट केले. फार्म टू प्लेट या संकल्पेनुसार या साखळीत जे जे लोक सामील आहेत, त्या सर्वांवर मार्गदर्शक सूचना लागू होणार आहेत, असेही ते म्हणाले.दूध उत्पादक, दूध गोळा करणाऱ्यांपासून ते कोल्ड चेनपर्यंत, प्रक्रिया करण्यापासून ते वाहतुकीद्वारे विक्रेत्यांपर्यंत दूध पोहोचवण्याकरिता जे जे लोक कार्यरत आहेत, त्या सर्वांना २०११ सालचे परवान्याचे किंवा नोंदणीचे मानक लागू आहेत. अन्न उत्पादन मानके व अन्न संयोजके याचेही नियम लागू आहेत. त्याचबरोबर दूषके, अवशेष याचेही २०११ चे नियम लागू आहेत. विक्रीवरील प्रतिबंध आणि निर्बंध लागू आहेत. लेबलिंग आणि प्रदर्शन, अन्न सुरक्षा पॅकेजिंग, तसेच जाहिरात आणि दावे याचेही नियम लागू असल्याचे आयुक्ता तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्याकरिता २००६, २०११ आणि इतर आठ प्रकारच्या नियमांचे पालन होणे अत्यावश्यक असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.दूध संकलन केंद्र, दूश शीतकरण केंद्र, दुग्ध प्रक्रिया युनिट्स व उत्पादक, पॅकर्स आणि फिलिंग स्टेशन, वितरक, वाहतूकदार, घाऊक विक्रिते, किरकोळ विक्रेते यांना हे नियम लागू असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. यात सुटे दूध विक्रेतेही समाविष्ट असल्याचे त्यांनी म्हटले.

दूध संकलन केंद्र, दूश शीतकरण केंद्र, दुग्ध प्रक्रिया युनिट्स व उत्पादक, पॅकर्स आणि फिलिंग स्टेशन, वितरक, वाहतूकदार, घाऊक विक्रिते, किरकोळ विक्रेते यांना हे नियम लागू असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

दुग्धजन्य पदार्थांचे विक्रेते, त्याचे पॅकिंग करणारे यांनाही नियम लागू असणार आहेत. पनीर, खवा, तूप, लोणी, क्रीम, दही, आईस्क्रिम, चीज, दूध पावडर, फ्लोअर मिल आणि इतर दुग्धजन्य पदार्थ आणि त्याचे उत्पादक यांनाही वरील मानके लागू असणार आहेत. या सर्वांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे. जेणेकरून ग्राहकाच्या थाळीत सुरक्षित आणि दर्जेदार दूध पोहोचेल. त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ किंवा छेडछाड असणार नाही, अशी भावना तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles