राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ शिवारात शनिवारी (4 जुलै) मध्यरात्री पुणे ग्रामीण पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अहिल्यानगर व नाशिक पथकाने संयुक्त धाड टाकत सुमारे एक लाख रूपये किमतीच्या 25 गोण्या संशयास्पद डेअरी पावडरचा साठा जप्त करून सीलबंद केला. संबंधित व्यक्तीकडे साठवणुकीचा परवाना नसल्याचे तसेच पावडरच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील कोणतीही बिले अथवा कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने प्रशासनाने ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत उघडकीस आलेल्या डेअरी पावडर प्रकरणाचा तपास करताना त्याची धागेदोरे राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ शिवारापर्यंत पोहोचले. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी एफडीएच्या अधिकार्यांसह घोरपडे नामक शेतकर्याच्या घरावर छापा टाकला. तेथे 25 गोण्या डेअरी पावडर आढळून आल्या. मात्र, त्या साठवण्याचा परवाना किंवा खरेदी-विक्रीची अधिकृत कागदपत्रे सादर करता आली नाहीत.
यामुळे पथकाने सविस्तर पंचनामा करून संपूर्ण साठा जागेवरच सीलबंद केला. तसेच प्रयोगशाळा तपासणीसाठी पावडरचे नमुने ताब्यात घेण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्याने सांगितले. मात्र, या कारवाईनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. संशयास्पद साठा मिळूनही संबंधित शेतकर्याला ताब्यात का घेण्यात आले नाही? पुणे ग्रामीण पोलिसांनी अहिल्यानगरमध्ये कारवाई केली म्हणजे त्यांच्या हद्दीत गुन्हा दाखल झाला होता का? जर गुन्हा दाखल असेल, तर आरोपीविरोधात तत्काळ कारवाई का झाली नाही? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नसल्याने कारवाईबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ शिवारात शनिवारी (4 जुलै) मध्यरात्री पुणे ग्रामीण पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अहिल्यानगर व नाशिक पथकाने संयुक्त धाड टाकत सुमारे एक लाख रूपये किमतीच्या 25 गोण्या संशयास्पद डेअरी पावडरचा साठा जप्त करून सीलबंद केला. संबंधित व्यक्तीकडे साठवणुकीचा परवाना नसल्याचे तसेच पावडरच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील कोणतीही बिले अथवा कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने प्रशासनाने ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत उघडकीस आलेल्या डेअरी पावडर प्रकरणाचा तपास करताना त्याची धागेदोरे राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ शिवारापर्यंत पोहोचले. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी एफडीएच्या अधिकार्यांसह घोरपडे नामक शेतकर्याच्या घरावर छापा टाकला. तेथे 25 गोण्या डेअरी पावडर आढळून आल्या. मात्र, त्या साठवण्याचा परवाना किंवा खरेदी-विक्रीची अधिकृत कागदपत्रे सादर करता आली नाहीत.
यामुळे पथकाने सविस्तर पंचनामा करून संपूर्ण साठा जागेवरच सीलबंद केला. तसेच प्रयोगशाळा तपासणीसाठी पावडरचे नमुने ताब्यात घेण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्याने सांगितले. मात्र, या कारवाईनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. संशयास्पद साठा मिळूनही संबंधित शेतकर्याला ताब्यात का घेण्यात आले नाही? पुणे ग्रामीण पोलिसांनी अहिल्यानगरमध्ये कारवाई केली म्हणजे त्यांच्या हद्दीत गुन्हा दाखल झाला होता का? जर गुन्हा दाखल असेल, तर आरोपीविरोधात तत्काळ कारवाई का झाली नाही? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नसल्याने कारवाईबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.


