आठव्या वेतन आयोगावर सर्वात मोठी अपडेट, कधी लागू होणार? सगळी माहिती समोर

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? पगार किती वाढणार? याकडे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचा नजरा खिळल्या आहेत. त्याबाबत आता सरकारकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे. ससंदेत सरकारकडून आठवा वेतन आयोग कधी लागू शकतो, याबाबतची माहिती दिली आहे. लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक आठवा वेतन आयोगाची वाट पाहत आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आठवा वेतन आयोगाची माहिती दिली आहे.केंद्र सरकारकडून ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची औपचारिकपणे स्थापना केल्याचे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत सांगितले. ते म्हणाले की, ‘केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन यांसंबंधी शिफारशींसह पूर्ण अहवाल सादर करण्यासाठी या आयोगाला १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. हा अहवाल सादर होऊन तो स्वीकारल्यानंतरच आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी कधी करायची हे ठरवलं जाईल. आयोग सध्या आपला अहवाल तयार करत आहे.’

आयोग आठवा वेतन आयोगाबाबत एकाच दृष्टिकोनाने काम केले जात नाही. त्यासाठी वेगवेगळ्या श्रेणींकडून सक्रियपणे सूचना मागवल्या जात आहे. MyGov या पोर्टलवर अठरा वेगवेगळे प्रश्न अपलोड करण्यात आले आहेत. मंत्रालये, विभाग, राज्य सरकारे, कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, संघटना, शिक्षणतज्ज्ञ आणि अगदी व्यक्तींकडूनही यावर मते मागवलेली आहेत. त्यासाठी ३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. हा अभिप्राय फक्त ऑनलाइनच स्वीकारला जाईल.

आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर किती पगार वाढणार, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. पण प्राथमिक अंदाजानुसार पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगासारखीच सर्व प्रकारची वाढ पगारात होईल. प्रतीक वैद्य म्हणाले की, मागील आयोगाचे कार्य आणि सध्याची अर्थव्यवस्था यावर पगारवाढ होतो. सहाव्या वेतन आयोगाच्या काळात पगारात अंदाजे ४० टक्क्यांनी वाढ झाली होती. तर सातव्या वेतन आयोगाच्या काळात ही वाढ २३ ते २५ टक्क्यांपर्यंत होती. आठव्या वेतन आयोगाअंतर्गत असलेले पगारदेखील याच घटकावर अवलंबून आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles