Thursday, November 6, 2025

मनःशांतीसाठी धनंजय मुंडे इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात; पकंजा मुंडे म्हणाल्या…आता त्यांना मनःशांती मिळेल!

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे काही दिवसांपासून मंत्रीपदाचा राजीनामा आणि त्यांच्यावर झालेले आरोप यामुळे ते चर्चेत होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘विपश्यना’ करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर धनंजय मुंडे यांनी योग्य पर्याय निवडला आहे आणि आता त्यांना मनःशांती मिळेल अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. मंत्री पंकजा मुंडे यांनी आज पुणे शहराला भेट दिली, जिथे त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणाला महत्त्व देण्याचे आवाहन केले असून, त्यानुसार हे कार्यक्रम राज्यात घेतले जात आहेत. दगडूशेठ गणपती मंडळ या पर्यावरणपूरक उपक्रमामध्ये सहभागी झाले आहे. त्यांनी यावेळी प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन केले.या भेटीदरम्यान त्यांनी बंधू धनंजय मुंडे यांच्या ‘विपश्यना’ निर्णयावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली, तसेच पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरही भाष्य केले.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांना अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्याविषयी विचारणा करण्यात आली. धनंजय मुंडे मागील आठ दिवसांपासून नाशिकमधील इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात दाखल झाले आहेत. मंत्रीपदाचा राजीनामा, विविध आरोप आणि वादांमुळे मनःशांतीसाठी ते तिथे गेले असल्याचे बोलले जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांनी योग्य पर्याय निवडला आहे आणि आता त्यांना मनःशांती मिळेल. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरही त्यांनी भाष्य केले. सासरच्या त्रासाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केल्याचा आरोप असून, याप्रकरणी तिचा पती आणि सासरच्या मंडळींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले सासरा राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे सदस्य असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, वैष्णवीला न्याय मिळायलाच पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक ती प्रत्येक पाऊल उचलली पाहिजे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असेही त्या म्हणाल्या. महिला आयोगाने अशा तक्रारींची दखल घेणे आणि पोलिसांनी कारवाई करणे महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles