शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीची ६० वर्षे; सुप्रिया सुळेंची खास पोस्ट, म्हणाल्या,

राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांची संसदीय कारकिर्द साठाव्या वर्षात पदार्पण करत आहेत. गेल्या साठ वर्षांतील राज्यातील आणि देशातील राजकीय चढउतार शरद पवारांनी पाहिले आणि अनुभवले आहेत. त्यामुळे ते केंद्रातील ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या साठ वर्षांच्या कारकिर्दीबद्दल त्यांची लेक आणि संसदपटू सुप्रिया सुळे यांनी खास पोस्ट लिहिली आहे.
महत्त्वाच्या घडामोडींचे साक्षीदार

“आदरणीय पवार साहेब यांची संसदीय कारकीर्द आज साठाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. या सहा दशकांच्या काळात कित्येक महत्त्वाच्या घडामोडींचे ते साक्षीदार आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी सहा वेळा तर एकदा विधानपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. तब्बल सात वेळा ते लोकसभेत निवडून गेले तर दोन वेळा त्यांनी राज्यसभेत प्रतिनिधित्व केले आहे”, असं सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
जनतेच्या विश्वासाच्या बळावर प्रवास शक्य झाला

“सन १९६७ साली आजच्या दिवशी सुरू झालेला हा अविजीत प्रवास आजही अव्याहतपणे सुरू आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांच्यासोबत त्यांचे जीवाभावाचे सोबती, कार्यकर्ते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मायबाप जनता ठामपणे उभे राहिले. जनतेने आदरणीय त्यांच्यावर अलोट प्रेम केले, प्रचंड विश्वास टाकला. या विश्वासाच्या बळावरच हा प्रवास शक्य झाला आहे. याबद्दल या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार”, असं म्हणत सुप्रिया सुळे यंनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles