भाजपच्या अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते यांची वर्णी लागली आहे. तसेच राज्यातील 22 जिल्हाध्यक्षांच्या निवडी भाजपचे प्रदेश निवडणूक अधिकारी आ. चैनसुख संचेती यांनी जाहीर केल्या आहेत.
अहिल्यानगर भाजप शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. प्रत्येकाने वरिष्ठ पातळीवर पदासाठी फिल्डिंग लावली होती. अखेर अनिल मोहिते यांच्या गळ्यात भाजप शहर जिल्हाध्यक्षदाची माळ पडली आहे.राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्डभूीवर भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकांनंतर भाजपने वरिष्ठ नेते रविंद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याऐवजी पक्षीय स्तरावर मोठी जबाबदारी दिली. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपने संघटन पर्व अभियान राबवले. त्या माध्यमातून भाजपने तब्बल दीड कोटी सदस्य नोंदणी पूर्ण केली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही रणनीती आखण्यात येत आहे. त्यातच, आता भाजपने राज्यातील सर्वच जिल्ह्यांसाठी भाजपच्या नव्याने जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग, व उत्तर जिल्हाध्यक्षपदी नितीन दिनकर यांनाच संधी दिली आहे.
राज्यातील अनेक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती जाहीर झाली होती मात्र नगर शहर जिल्हाध्यक्षाची निवड राखून ठेवण्यात आली होती. नगर शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी मोठी रस्सीखेच झाली होती. या पदासाठी अहिल्यानगरधून विद्यान अध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, सचिन पारखी, धनंजय जाधव, अनिल मोहिते यांची नावे चर्चेत होती. अखेर मोहिते यांच्या गळ्यात शहर जिल्हाध्यक्षपदाची माळ पडली आहे. मोहित यांच्यासमोर पक्ष वाढीची सर्वात मोठी जबाबदारी असणार आहे. तसेच आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला सत्ता मिळवून देणे हे मोठे आव्हान असणार आहे.


