Tuesday, November 4, 2025

नगर तालुक्यात अतिवृष्टी खासदार नीलेश लंके यांची पाहणी करत आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत

हिल्यानगर : प्रतिनिधी चार दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे हाहाःकार माजला होता. खासदार नीलेश लंके यांनी या भागाची पाहणी करत आपत्तीग्रस्तांना तातडीची मदतही केली. नुकसानीची तिव्रता लक्षात आल्यानंतर आता रविवारी गावागावांमध्ये जाऊन विविध सेवा पुरविण्याचा संकल्प करत खा. नीलेश लंके हे पुन्हा फिल्डवर उतरणार आहेत.
यासंदर्भात बोलताना खा. लंके यांनी सांगितले की, चार दिवसांपूव नगर तालुक्यातील सारोळा कासार, वाळकी, अकोळनेर, जाधववाडी, खडकी, सोनेवाडी या गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. या परिसरातील रस्ते उध्वस्त झाले असून या भागातील ग्रामस्थांना आधार देण्यासाठी आपला मावळा संघटना व नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने रस्ते दुरूस्ती तसेच जनजीवन सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून या मोहिमेस सुरूवात होणार असून त्यात रस्ते दुरूस्ती, वैद्यकीय, पशुवैद्यकीय मदत करण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन खासदार नीलेश लंके यांनी केले आहे.
खा. लंके म्हणाले, अतिवृष्टीमुळे झालेल्या संकटात मी शेतकऱ्यांसोबत आहे. केवळ मी शेतकऱ्यांसोबत आहे असे सांगार नसून माझ्या बळीराजाला मी प्रत्यक्ष मदत मिळवून देणार आहे. आपला मावळा व नीलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही रविवारी मदत करणारच आहोत. त्याच बरोबर शासनाची मदत मिळवून देण्यासाठीही लोकप्रतिनिधी या नात्याने मी कटीबध्द आहे.

शेती, जनावरे, घरांचे मोठे नुकसान

अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतीचे, पाळीव जनावरांचे, घरमालमत्तांचे मोठे नुकसान झाले. या आपत्तीमुळे अनेकांचे संसार, पाळीव जनावरे अक्षरशः डोळयादेखत वाहून गेले. ही दृश्ये मन हदरविणारी होती. अशा कठीण प्रसंगी विविध गावांना भेटी देत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पाण्याखाली गेलेली पीके, ओसाड पडलेले जनावरांचे गोठे, घरात घुसलेलं चिखलयुक्त पाणी हे या भागातील ग्रामस्थांच्या डोळयात स्पष्टपणे पाहिले. त्यामुळेच आम्ही मावळे रविवारी मदतकार्यासाठी या गावांमध्ये पोहचणार आहेत.

खासदार नीलेश लंके
लोकसभा सदस्य

मदत कार्यात सहभागी व्हा

आपल्या बांधवांवर अतिवृष्टीमुळे आपत्ती ओढावली असून त्यांच्या मदत कार्यासाठी आपला मावळा व नीलेश लंके प्रतिष्ठान रविवारी दिवसभर मोहिम राबविणार आहे. या मदत कार्यामध्ये जिल्हयातील तरूणाईने उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवावा.

खासदार नीलेश लंके
लोकसभा सदस्य

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles