Saturday, February 21, 2026

भाजप शहर जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते यांची नियुक्ती, पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना सन्मान मिळणार

भाजप शहर जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते यांची नियुक्ती ; केडगावकरांना न्याय मिळाला – साहेबराव विधाते

नगर – भाजपच्या शहरजिल्हाध्यक्ष पदी अनिल मोहिते यांची निवड म्हणजे केडगावकरांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा सन्मान असून गेल्या 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्यांनी संघर्ष केला. वेळ प्रसंगी गुन्हे दाखल झाले. अनेकांवर अन्याय झाला. सत्तेच्या काळात केडगावला अध्यक्षपद मिळाल्याने आगामी काळात विकासाला गती मिळणार असल्याची भावना भाजपाचे केडगाव मंडल माजी अध्यक्ष साहेबराव विधाते यांनी व्यक्त केले.

भाजप शहर जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते यांची नियुक्ती झाल्याबद्दल भाजपाचे केडगांव मंडल माजी अध्यक्ष साहेबराव विधाते यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी अभिजित विधाते उपस्थित होते.

पुढे बोलताना साहेबराव विधाते म्हणाले की, मोहिते हे श्रीलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी (बुरुडगाव) तसेच लक्ष्मी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी (केडगाव) या आर्थिक संस्थांचे संस्थापक आहेत तसेच त्यांचा ढवळपुरी (ता. पारनेर) येथे कृषीनाथ ग्रीन एनर्जी हा खाजगी साखर कारखाना आहे व या कारखान्याचे ते उपाध्यक्ष आहेत. याशिवाय सिंदखेड राजा (बुलढाणा) तालुक्यातील दुसरबीड येथील जिजामाता सहकारी साखर कारखान्याचे ते कार्यकारी संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. केडगाव उपनगरातील एस. एस. मोहिते विद्यालयाचे संस्थापक आणि वसुंधरा कृषी व ग्रामीण विकास संस्थेचे मुख्य प्रवर्तक आहेत. यशदा संस्थेचा जलनायक हा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. त्यांच्या सामाजिक व राजकीय कारर्दिचा पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्याना अभिमान आहे. अनेक वर्षापासून मुळ प्रवाहपासून दुर गेलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना या निवडीमुळे उत्साह संचारला आहे. आगामी महानगर पालिका निवडुकीत या निवडीमुळे निष्ठावान कार्यकर्त्यांना सन्मान मिळणार असल्याची भावना साहेबराव विधाते यांनी व्यक्त केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles