Saturday, February 21, 2026

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची ९८ वी वार्षिक सभा खेळीमेळीत; सभासदाभिमुक कारभारामुळे सोसायटीचा राज्यात लौकिक

सभासदाभिमुक कारभारामुळे जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचा राज्यात लौकिक
लेखाधिकारी रमेश कासार; सोसायटीची ९८ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न
अहिल्यानगर – गेल्या ९८ वर्षांची उत्कृष्ट परंपरा असलेल्या अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचा कारभार आणि संस्थेकडून सभासदांसाठी राबविले जाणारे उपक्रम सहकारी संस्थांसाठी पथदर्शक असून त्यामुळेच फक्त जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात या संस्थेचा लौकिक गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानचे लेखाधिकारी रमेश कासार यांनी काढले. संस्थेच्या संचालक मंडळाने आणि सर्व सभासदांनी संस्थेचा लौकिक या पुढील काळात आणखी वाढवावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची ९८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार (दि ७) नगर मधील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, टिळक रोड येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी लेखाधिकारी रमेश कासार, तर प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते राहुल गिरी हे उपस्थित होते. प्रारंभी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सन्मान चिन्ह व रोख बक्षिसे देवून करण्यात आला.
यावेळी व्याख्याते राहुल गिरी यांनी विविध उदाहरणे देत इच्छा असेल तर जीवनात सर्व काही शक्य आहे. मुलांवर खरे संस्कार कुटुंबातच होतात, त्यामुळे उद्याचे चांगले नागरिक घडविण्यासाठी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी पालकांनी वेळ द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
सभेचे प्रास्ताविक चेअरमन कल्याण मुटकुळे यांनी करत संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. सभेच्या विषय पत्रिकेवर चर्चेला सुरुवात झाल्या नंतर सर्व उपस्थित सभासदांना बोलण्याची संधी देत त्यांचे म्हणणे ऐकून घेत जो पर्यंत त्यांच्या शंकांचे निरसन होत नाही तोपर्यंत प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा संचालक मंडळाने घडवून आणली. दुपारी १२ ला सुरु झालेली सभा सायंकाळी ५.३० पर्यंत चालली.
या सभेत संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार पोटनियम दुरुस्ती, सभासद कर्ज मर्यादा २० लाखापर्यंत वाढविणे, सभासद कुटुंब आधार योजनेत मयत सभासदांचा १५ लाखांपर्यतचा लाभ देण्याचा ठराव कायम करणे, यासह विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. संस्थेच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या जागेवर नवीन इमारत बांधकाम सुरु असून या इमारतीतून संस्थेला अधिक उत्पन्न कसे मिळेल याचा विचार व्हावा, वीज बिल बचतीसाठी सौरप्रकल्प राबवावा अशा सूचना करण्यात आल्या.
यावेळी सभासद विकास साळुंके, अभय गट, विजय कोरडे, सोमनाथ भिटे, संदीप मुखेकर, प्रवीण राऊत, संदीप अकोलकर, मनोज चोभे, शिवहरी दराडे, हेमंत परांडकर, मनोहर डिसले, चंद्रशेखर वांढेकर, गणेश चने, निलेश गाडेकर, अशोक कदम, राजेश तिटमे, किरण खेडकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. सभासदांच्या प्रश्नांना चेअरमन कल्याण मुटकुळे, संचालक संजय कडूस, अरुण जोर्वेकर, व्यवस्थापक राजेंद्र पवार आदींनी उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.
सभेस व्हाईस चेअरमन श्रीमती मनिषा साळवे संचालक विलास शेळके, प्रशांत मोरे, विक्रम ससे, चंदकांत संसारे, इंजी. राजू दिघे, भाऊसाहेब चांदणे, डॉ. दिलीप डांगे ,ऋषीकेश बनकर, स्वप्नील शिंदे, सुधीर खेडकर, श्रीकांत देशमाने, काशिनाथ नरोडे, कैलास डावरे, योगेंद्र पालवे, अर्जुन मंडलिक, श्रीमती ज्योती पवार, श्रीमती सुरेखा महारनुर, संभाजी आव्हाड, प्रशांत निमसे, नितीन चोथवे, दीपक गोधडे, उप व्यवस्थापक प्रशांत लोखंडे व कर्मचारी वृंद तसेच जिल्हाभरातून आलेले सभासद उपस्थित होते.
फोटो ओळी – अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या ९८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे दीपज्वलन करताना जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानचे लेखाधिकारी रमेश कासार, व्याख्याते राहुल गिरी, चेअरमन कल्याण मुटकुळे, पॅनल प्रमुख संजय कडूस व संचालक मंडळ.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles