महाराष्ट्रात दारू महागणार आहे. भारतीय बनावटीची विदेशी दारूच्या किमतीत दीड टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय.. हॉटेलमध्येही शॉपसारखी मद्याची विक्री करता येणार आहे. कराराद्वारे भाडेतत्त्वावर रेस्टॉरंटला विदेशी दारूविक्रीस परवानगी देण्यात आलीय. त्यामुळे हॉटेल रेस्टॉरंटमधील मद्य विक्रीवर 10 ते 15 टक्के अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय.
महाराष्ट्रातील तळीरामांची खिशाला कात्री लावणारा निर्णय राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. सरकारच्या एका निर्णयाने महाराष्ट्रातील दारू महागली आहे. भारतीय बनवाटीच्या विदेश मद्यावर तब्बल दीड टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे सरकारच्या निर्णयामुळे १४ हजार कोटींचा महसूल वाढवणार आहे. महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने निर्णय घेतला आहे.
उत्पादन शुल्क विभागाकडून मद्याच्या दर वाढ करण्यात आली आहे. १८० मिली मद्याच्या दरात किरकोळ वाढ करण्यात आली आहे. तर देशी मद्य ८० रुपये, राज्यातील मेड लिकर १४८ रुपये, भारतीय बनावटीचे विदेश मद्य २०५ रुपये, विदेशी मद्याच्या प्रिमीयम ब्रँडची किंमत ३६० रुपये इतकी झाल आहे. तसेच मद्य शुल्कवाढीसह सीलबंद मद्य विक्री हॉटेल आणि रेस्टॉरंट कराराद्वारे भाडेतत्वावर चालवण्यात मान्यता देण्यात आली आहे. यावर एकूण दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे.ची नितेश राणेंना समज; म्हणाले
कोणतं मद्य कितीला मिळणार?
180 मिली मद्य किरकोळ विक्रीची किंमत
देशी मद्य- 80 रुपये
महाराष्ट्र मेड लिकर – 148 रुपये
भारतीय बनावटीचे विदेशी मद्य – 205 रुपये
विदेशी मद्याचे प्रमीयम ब्रॅण्ड- 360 रुपये


