Saturday, February 21, 2026

महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडिओ AI च्या मदतीने बनवले, दोन नामांकित डॉक्टरांसोबत प्रकार

साताऱ्यातील कराडमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कराडमधील दोन नामांकित डॉक्टर महिलांचे AIच्या माध्यमातून अश्लिल व्हिडिओ बनवल्याचं समोर आलं असून या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर म्हणून घेणाराच एक संशयित असल्याचे समोर आले आहे. संबंधित डॉक्टरकडे चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कराडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कराडमधील दोन नामांकित महिला डॉक्टरांचे AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. महत्वाचं म्हणजे हे व्हिडिओ परराज्यातून तयार करण्यात आले असून, ते बनावट असल्याचे आणि एआयच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. व्हिडिओमध्ये संबंधित महिला डॉक्टर दोन युवकांसोबत अश्लील चाळे करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. हे प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होऊ नयेत म्हणून संबंधित डॉक्टरांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी संशयाच्या आधारे कराडमधीलच एका डॉक्टरसह दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू असून, या घटनेचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर असल्याचे सांगत होता, अशी माहितीही समोर आली आहे. पोलिसांनी याबाबत अधिकृतरित्या सांगितले की, चौकशीदरम्यान अनेक तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत.कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड पोलीस ठाण्याला पंधरा दिवसांपूर्वी दोन डॉक्टर महिलांची तक्रार आली होती. त्यांचे अश्लील व्हिडिओ एका इसमाने टाकल्याची तक्रार आली होती. या तक्रारीवरून कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आयटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केल्याने सायबरच्या मदतीने हे व्हिडिओ कोणी टाकले आहे त्याचा तपास करत असताना विकास शर्मा या पंजाबच्या इसमाने हे केल्याचे उघड झाल आहे. 54 वर्षांच्या या इसमाने सांगितले की कराड मधील राजीव शिंदे या डॉक्टर इसमाने हा प्रकार करायला सांगितल्याचे त्याने सांगितले.

पैशांची नड, टास्क करायला सांगितला
पैशांची गरज असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं एक टास्क करावा लागेल. यामध्ये मी सांगतो तसं कर असं सांगत, यावेळी राजेश शिंदे या आरोपीने काही मोबाईल नंबर पाठवत या नंबरचा ग्रुप करण्यास सांगितले. यानंतर महिलांचे अश्लील व्हिडिओ तयार करत तो पाठवला. विकास शर्मा या इसमाने त्याच्या मोबाईलवरून हे अश्लील व्हिडिओ पुढे टाकले. मी असे तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या संदर्भात विकास शर्मा आणि राजेश शिंदे या दोन्ही आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles