Saturday, February 21, 2026

सात जन्मासाठी वटपौर्णिमेचे व्रत करण्याच्या दिवशीच पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे वार करून खून; तरूणीला अटक

सात जन्मासाठी वटपौर्णिमेचे व्रत करण्याच्या दिवशीच पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे वार करून खून करण्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी संशयित तरूणीला औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी अटक केली असल्याचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी सांगितले.कुपवाडमधील प्रकाशनगरमध्ये वास्तव्य असलेल्या अनिल लोखंडे (वय ५३) याचा डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी समोर आली. या प्रकरणी मृताची पत्नी राधिका इंगळे (वय २७) या संशयित तरूणीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, मृत लोखंडे याच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले होते. नंतर त्यांने राधिका इंगळे (रा. वडी, ता. खटाव, जि. सातारा) हिच्याशी १७ मे २०२५ रोजी विवाह केला. लग्नानंतर दोघांमध्ये वाद होत होते. यातूनच काल रात्री पती झोपी गेला असताना त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. यात तो जागीच ठार झाला. या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात संशयिताविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles