Saturday, February 21, 2026

अहिल्यानगर शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत

बोल्हेगाव परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत

लाईटचे पोल, तारा तुटून रस्त्यावर अक्षरशा झाडे कोलमडून पडली

आमदार संग्राम जगताप यांच्या तत्परते मुळे बोलेगावातील आपत्कालीन परिस्थितीतील कामे तातडीने मार्गी – माजी सभापती कुमारसिंह वाकळे

अहिल्यानगर : शहरामध्ये सायंकाळी आठच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे बोल्हेगाव परिसरामध्ये अक्षरशा मोठमोठी झाडे रस्त्यावर कोलमडून पडली त्यामुळे लाईटचे पोल, तारा रस्त्यावर तुटुन पडल्या असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत परिस्थितीची पाहणी केली व शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने महापालिका आपत्कालीन विभागाशी संपर्क साधत अधिकारी कर्मचारी यांना घटनास्थळी पाठवले
माजी सभापती कुमारसिंह वाकळे म्हणाले, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात रस्त्यावर मोठमोठे झाडे पडली होती ते तातडीने काढण्याचे काम केले त्यामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली, गावातील युवकांनी भर पावसात आपत्कालीन परिस्थिती मधील कर्मचाऱ्यांना मदत केली तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या तत्परतेमुळे बोल्हेगावातील आपत्कालीन परिस्थितीतील कामे तातडीने मार्गी लागत नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले असे त्यंनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles