महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना, अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर.
दि. ११ जून २०२५ रोजी जिल्हा परिषद सभागृहात राज्य कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष श्री. दादाभाऊ गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणी निवडणूक पार पडली. संघटनेची कार्यकारिणी खालीलप्रमाणे, अध्यक्ष- श्री. राहुल अशोक शेळके – उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.), उपाध्यक्ष- श्री. भगवान उत्तमराव बच्छाव, सहाय्यक गटविकास अधिकारी (ग्रामपंचायत) महिला उपाध्यक्ष- श्रीम.राणी फराटे, गटविकास अधिकारी – श्रीगोंदा, सरचिटणीस- श्री संदीप दळवी सहा. गटविकास अधिकारी, कोपरगाव, कोषाध्यक्ष- श्री. दिलीप सोनकुसळे, सहा. गटविकास अधिकारी, अहिल्यानगर, कार्याध्यक्ष- श्री. राजेंद्र (बाबा) देसले- प्रकल्प संचालक (एसबीएम) मुख्य सल्लागार- श्री. संभाजी भगवंतराव लांगोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सल्लागार- श्री. दादाभाऊ नामदेव गुंजाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रवक्ता- श्री. सुधाकर मुंडे – गट विकास अधिकारी, राहुरी, महिला प्रतिनिधी- सोनल शहा गटविकास अधिकारी, शेवगाव यांची निवड करण्यात आली. जिल्हा परिषद, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद भंडारी यांनी नुतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले.


