Saturday, February 21, 2026

नगर जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्ह्यातंर्गत बदल्या ,पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी काढले आदेश

अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्ह्यातंर्गत बदल्या ,पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी काढले आदेश
अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलीस निरीक्षकांच्या बदलल्यानंतर आता सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) व पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) यांच्या जिल्ह्यातंर्गत बदल्या केल्या आहेत. तर जिल्ह्यात नव्याने हजर झालेल्या सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांना पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे. 22 अधिकार्‍यांच्या बदलीबाबतचे आदेश अधीक्षक घार्गे यांनी शुक्रवारी (13 जून) रात्री उशिरा काढले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक नाव व कंसात बदली झालेले पोलीस ठाणे : हरीष भोये (स्थानिक गुन्हे शाखा), संगीता गिरी (राहाता), सुदाम शिरसाठ (राहुरी), तेजश्री थोरात (कोतवाली), रामचंद्र शिखरे (श्रीरामपूर शहर).

पोलीस उपनिरीक्षक नाव व कंसात बदली झालेले पोलीस ठाणे : दीपक पाठक (वाचक, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, अहिल्यानगर), संदीप मुरकुटे (राहुरी), योगेश चाहेर (तोफखाना), ज्योती डोके (दहशतवाद विरोधी शाखा, अहिल्यानगर), संदीप ढाकणे (पाथर्डी), संदीप कान्हेरे (जामखेड), दादाभाई मगरे (शिर्डी), चारूदत्त खोंडे (शिर्डी), योगेश पवार (आर्थिक गुन्हे शाखा), गणेश वाघमारे (शेवगाव), प्रदीप बोरूडे (श्रीरामपूर शहर), संदीप सोन्ने (कोपरगाव शहर), परशुराम दळवी (तोफखाना), राजु जाधव (राहुरी), सागर काळे (शिर्डी), सुदाम काकडे (सायबर), संजय वाघमारे (श्रीगोंदा).

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles