अहिल्यानगर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर करण्याची मागणी
दि १५ जून २०२५ रविवार रोजी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस यांची अहिल्यानगर च्या शिष्टमंडळाने भेट घेतली व अहिल्यानगर ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे व राज्य सरकारचे शिष्टमंडळाने आभार मानले. व हे महाविद्यालय नगर शहरात च व्हावे हा आग्रह शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे धरला त्यास देवेंद्रजींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याच बरोबर वैद्यकीय क्षेत्रातील काही अधिकारी हे महाविद्यालय नगर शहरात होऊ नये म्हणून अडथळे आणत असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री महोदयांना देण्यात आली.
त्याच बरोबर अहिल्या नगर जिल्ह्या हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने तसेच राजकीय सामाजिक, व सहकार अशा सर्वच दृष्टीने मोठा आणि महत्त्वाचा जिल्हा आहे. तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतर शहरात आर्थिक परिस्थिती नसताना जावे लागते. असे असताना या जिल्ह्यास अद्याप पर्यंत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय होवू शकले नाही ही खेदाची बाब आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच जनतेची अग्रहाची मागणी आहे की आपण या बाबतीत लक्ष घालुन लवकरात लवकर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर करावे व ते नगर शहरात च व्हावे अशी मागणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस यांनी महाविद्यालय मंजूर करण्याचे आश्वासन दिले.
या शिष्टमंडळात भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, तथा माजी जिल्हाध्यक्ष प्रा भानुदास बेरड, शहराचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड अभय आगरकर, जिल्हापरिषदेचे भाजपा गटनेते श्री जालिंदर वाकचौरे, शहर सरचिटणीस श्री सचिन पारखी, जेष्ट नेते श्री वसंत लोढा, शहर सरचिटणीस श्री पंडित वाघमारे, शहर सरचिटणीस श्री प्रशांत मुथा आदि चा समावेश होता.


