अहिल्यानगरच्या ‘सिव्हिल’मध्ये शासकीय मेडिकल कॉलेज सुरू

अहिल्यानगरच्या ‘सिव्हिल’मध्ये
शासकीय मेडिकल कॉलेज सुरू

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण

मुंबई- राज्यात नव्याने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय मेडिकल कॉलेज, अहिल्यानगर’ यंदापासून सुरू होत आहे. मागील वर्षी 6 मे 2025 रोजी अहिल्यादेवीचे जन्मस्थळ चौंडी (ता. जामखेड) येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मेडिकल कॉलेजची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी वर्षभरात महायुती सरकारने केली आहे.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या कॉलेजची मागणी केली होती. तिची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यंदापासूनच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सुरू होत असल्याची घोषणा सोमवारी (27 एप्रिल) केली.
यामुळे नगरच्या सिव्हिल हॉस्पीटलमध्ये 100 विद्यार्थी संख्या आणि 430 बेडची क्षमता असलेले वैद्यकीय कॉलेज-रुग्णालय सुरू होत असून या कॉलेजची प्रवेश प्रक्रिया याचवर्षी 2026 पासून सुरू होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles