भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी दिली मोदी सरकारच्या प्रगती व विकासाची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ ११ वर्षात विकसनशील भारतास
विकसित भारत बनवत साधली सर्वांगीण प्रगती
अहिल्यानगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकसित भारताच्या अमृतकाळामध्ये सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची नवी यात्रा सुरु केली आहे. मोदी सरकारच्या प्रत्येक योजनेने जनकल्याणच केले आहे. सामान्य माणसाचे जीवन सुखकर करत देशाची जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण करून दिली आहे. गेल्या ११ वर्षात मोदी सरकारने देशाच्या सीमा मजबूत केल्या करून अर्थव्यवस्था मजबूत केली. तसेच तंत्रज्ञानाला सामान्य माणसापर्यंत पोहचवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ ११ वर्षात विकसनशील भारतास विकसित भारत बनवत सर्वांगीण प्रगती साधली आहे, अशी माहिती भाजपाचे तिन्ही जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषदेत दिली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या दोन तृतीयांशपेक्षा अधिक जागा निवडून आणण्यावर भाजपचे लक्ष आहे. या निवडणुकीत स्वबळावर की महायुतीतून लढविण्याबाबतचा स्थानिक पदाधिकारी जो निर्णय घेतील, त्या निर्णयास प्रदेश भाजप समिती मान्यता देणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष मोहिते यांनी सांगितले.
मात्र याबाबत पालकमंत्री विखे पाटील आणि भाजपचे आमदार अंतिम निर्णय घेणार आहेत. नवीन वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरात होणार आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय देखील शहरात सुरु केले जाणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
देशातील मोदी सरकारला नुकतेच ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. या कालावधीत झालेल्या विकास व प्रगतीची माहिती भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर व दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी स्वागत करताना दिलीप भालसिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव करून देशात त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व क्षेत्रात मोठी प्रगात्री होत असल्याचे सांगितले.
अनिल मोहिते म्हणाले, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी जो अंत्योदयाचा विचार मांडला होता तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रत्यक्षात आणून सर्व सामान्य तळागाळातील नागरिकांसाठी काम करत त्यांचे कल्याण क्रेत आहे. कधीही नव्हे एवढे मोठे विकासाचे कार्य गेल्या ११ वर्षात देशात उभे राहिले आहे.
नितीन दिनकर म्हणाले, जसा भारत देश व महाराष्ट्र राज्य प्रगती करत आहे तसाच आपला जिल्ह्यातही सर्वांगीण विकास कामे होत आहेत. केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने लाखो नागरिक या योजनांचा लाभ घेत आहेत. नगरमध्ये आता सर्व महामार्गांची कामे मार्गी लागली असून लवकरच राज्यातील पहिला पुणे ते संभाजीनगर असा तीन माजली रस्त्याचे काम सुरु होणार आहे. जिल्ह्यातील सर्व एमआयडीसिंमध्ये औद्योगिक क्षेत्रातही मोठ्याप्रमाणात वाढत आहे.
यावेळी माझी महापौर बाबासाहेब वाकळे,भारतीय जनता पार्टीचे अशोक गायकवाड, महेश नामदे, सविता कोटा, केडगाव मंडलाध्यक्ष भरत ठुबे , भिंगार मंडळ अध्यक्ष सचिन जाधव, मध्यमंडल अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, बाळासाहेब भुजबळ, दादा दरेकर, महेश लांडगे, सचिन ठोकळ, विद्या शिंदे, संदीप परभणे, सचिन कुसळकर आदी उपस्थित होते
मोदी सरकारचे ११ वर्षातील ठळक मुद्दे
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले, पाकिस्तानचा हवाई तळ ही उध्वस्त केला. हिंसाचाराला, दहशतवादाला घरात घुसून उतर दिले जाईल, हेच मोदी सरकारने दाखवून दिले आहे. क्षेपणास्त्र रक्षण करणारी एस- ४०० प्रणाली तसेच ब्रम्होस, आकाश क्षेपणास्त्रे, आयएनएस विक्रात, तेजस आणि प्रचंड अटॅक हेलिकॉप्टर सारख्या भारतात बनवलेल्या उत्पादनांनी भारत हा संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर झाल्याचे जगाला दाखवून दिले आहे.
युध्द, नैसर्गिक आपत्ती अशा संकटात सापडलेल्या विदेशातील भारतीय नागरिकांना मोदी सरकारने सुखरूप मायदेशी आणले आहे. मोदी सरकार है केवळ देशातील भारतीयांच्या सुरक्षेसाठी वचनबध्द असून जगभरातील भारतीयांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे. काही वर्षांपूर्वी देशात 96 जिल्हे नक्षलग्रस्त होते. मात्र मोदी सरकारने सुरक्षा दलांना मोठ्याप्रमाणात बळ देत तसेच नक्षलग्रस्त भागाचा विकास करत या भागातील नक्षलवाद संपविण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले आहे.
भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याकडे वाटचाल करीत आहे. जगात होणा-या एकूण डिजिटील व्यवहारापैकी 49 टक्के व्यवहार भारतात होतात. भारताची वस्तू आणि सेवा निर्यात 825 अब्ज डॉलर पर्यंत पोहचली आहे. देशात होणा-या युपीआय व्यवहारांनी 24 लाख कोटीची मर्यादा गाठली आहे. देशात 116 कोटी मोबाईल वापरकर्ते आहेत. देशातील इंटरनेट वापरणा-यांची संख्या गेल्या 10 वर्षात 25.5 कोटी वरून 2024 मध्ये 97 कोटी पर्यंत पोहचली आहे. आता जीईएम पोर्टल द्वारे खरेदी होत असल्यामुळे सरकारी खरेदीतील भ्रष्टाचार पूर्णपणे संपला आहे. व्यवस्थेतील दलाल संपले आहेत आणि भ्रष्टाचारकमी झाला आहे. गेल्या 11 वर्षात देशातील जवळपास 25 कोटी लोक गरीबीतून बाहेर आले आहेत. पंतप्रधान जनधन योजनेतून 55.22 कोटी लोकाची बँक खाती उघडून सामान्य माणसाला बँकींग प्रवाहात आणले आहे.
मोदी सरकारने व्यवसाय सुलभता (इंज ऑफ दुई बिजनेस) है तत्व प्रत्यक्षात आणले आहे. त्यामुळे या क्षेत्राच्या जागतिक क्रमवारीत भारत 142 व्या क्रमांकावरून 63 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. व्यवसाय, उद्योग, सुलभतेमुळे भारतात 2023-24 मध्ये 1.80 लाखाहून अधिक नव्या कंपन्या नौदल्या गेल्या इमरजेन्सी कैडीट लाईन गॅरंटी योजनेद्वारे सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना कर्ज पुरवठा करत 2.39 लाख कोटी एवढी रक्कम एनपीए होण्यापासून वाचवतो 2024-25 मध्ये 825 अब्ज डॉलर एवढी निर्यात करून जागतिक पातळीवर नवा विक्रम प्रस्थापित केला
मध्यमवर्गीयाचे जीवन सुखकर बनवण्यासाठी मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या दिवसापासून प्रयत्न केले आहेत त्यामुळेच 12.75 लाखाचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला.
2024 मध्ये वाढवान 3 मोहिम यशस्वी झाली आता भारत गगन यान मोहिमेच्या तयारीला लागला आहे. अंतरिक्षात भारत नवनवा मोहिमा यशस्वी करत आहे सोधक वैज्ञानिकांना मोकळीक देऊन सरकारकडून सर्वप्रकारचे सहकार्य केले जात असल्यामुळे अंतराळात मोहिमा यशस्वी होत आहेत.
रस्ते पूल, बोगदे विमानतळ हवाई मार्ग, रेल्वे, बंटी यासारख्या क्षेत्रात मोठी सरकारने मोठी कामगिरी केली आहे जगातील सर्वात मोठ्या उवीच्या चिनाब नदीवरील पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतचे झाले तामिळनाडूतील रामेश्वरम देशातील पहिला व्हीकल तयार करण्यात आला आहे. 111 जलमागौना राष्ट्रीय जलमार्ग घोषित करण्यात आले आहे. गेल्या 5 वर्षात 3600 कि. मी. एवढ्या लांबीचे हायस्पीड कॉरीडॉर तयार करण्यात आले आहेत.
मोदी सरकारने 99 टक्के खेड्यांना रस्त्याद्वारे जोडण्याचे काम केले आहे. देशात दररोज 34 कि. मी. लांबीचे महामार्ग (हायवे) बांधले जात आहेत. रेल्वेसाठी अर्थसंकल्पातील तरतुद 9 पटीने वाढविण्यात आली आहे. देशात 136 ‘वंदे भारत’ रेल्वे सुरु झाल्या आहेत. 103 रेल्वे स्थानकांचे पुनर्निमाण केले जात आहे. उडान योजने अंतर्गत देशातील विमानतळांची संख्या दुपटीने वाढून ती 160 वर पोहचली आहे. त्यामुळे सामान्य माणसाचा विमान प्रवास शक्य झाला आहे.
2025-26 च्या अर्थसंकल्पात शेतीक्षेत्राची तरतुद 5 पटीने वाढविण्यात आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत 11 कोटीहून अधिक शेतक-यांना 3.7 लाख कोटी रूपये देण्यात आले आहेत. पंतप्रधान पीक विमा योजनेत आतापर्यंत 1.75 लाख कोटीहूनही अधिक रकमेची विमा भरपाई शेतक-यांना देण्यात आली आहे.
1गरीब कल्याण अन्न योजनेत 81 कोटी लोकांना दरमहा 5 किलो अन्न-धान्य मोफत दिले जाते. आवास योजने अंतर्गत 4 कोटीहूनही अधिक घरे बांधली गेली आहेत. 15 कोटीहूनही अधिक घरांमध्ये नळाद्वारे पाणी दिले जात आहे. 12 कोटीहून अधिक शौचालये बांधली गेली आहेत.
पंतप्रधान कृषि सिंचन योजनेद्वारे 93 हजार कोटी रु. खर्च करून 112 सिंचन योजना सुरु करण्यात आल्या आहेत. ई-नाम योजनेद्वारे 1 हजार 473 कृषि बाजार समित्या जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे शेतमालाला चांगला भाव मिळणे सोपे झाले आहे. शेतक-यांना 25 कोटीहूनही अधिक मृदा कार्डचे वाटप करण्यात आले आहे.
पर्यावरण रक्षणाच्या मुद्यातही भारताने गेल्या 11 वर्षात लक्षनीय कामगिरी केली आहे. एक पेड, मों के नाम अभियानात संपूर्ण देशात 142 कोटीहनही अधिक वृक्षारोपण झाले आहे. देशातील वाघांची संख्या वाढविण्यासाठी मोदी सरकारने केलेल्या प्रयत्नाना यश मिळत आहे. 2022 मध्ये देशातील वाघांची संख्या 3 हजार 682 पर्यंत पोहचली आहे.
विकास भी, विरासत भी या सुत्रानुसार मोदी सरकारने काशी विश्वनाथ कॉरीडॉर, महाकाल परियोजना, राम मंदिर निर्मिती केली आहे. डॉ आबेडकराशी संबंधीत 5 ठिकाणाचा पंचतीर्थ म्हणून विकास केला गेला आहे. राष्ट्रीय युध्द स्मारक तयार करून देशासाठी हुतात्मा झालेल्यांना अभिवादन केले गेले आहे.
नारीशक्ती वंदन अभिनियमाद्वारे महिलाना लोकसभा आणि विधानसभामध्ये 33 टक्के आरक्षण देण्याल आले आहे. तिहेरी तलाक पी अमानुष प्रथा संपुष्टात आणून मुस्त्रीम महिलांना मोठा दिलासा दिला आहे. बाळतपणाची रजा 26 आठवडे करण्यात आली आहे 3 कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 35.38 कोटी महिलाना 14 72 लाख कोटी एवढे कर्ज मुद्रा योजने अंतर्गत देण्यात आले आहे. पतप्रधान मातृत्व बदन योजने अंतर्गत 3.98 कोटी गर्भवती महिलाना 18 हजार 593 कोटी रुपये एवढे अर्थसहाय्य करण्यात आले आहे.
महिलांना सैनिकी शाळांमध्ये आणि राष्ट्रीय संख्क्षण अकादमी (NDA) मध्ये प्रवेश देण्यात येत आहे. LOC वर प्रथमच महिला सैनिक देशाच्या रक्षणासाठी उभ्या आहेत. मोठ्या संख्येने महिला पायलट तयार होत आहेत.
देशातील आयुर्विज्ञान संस्थांची (एम्स) संख्या वाढून आता 23 वर गेली आहे. व्यवस्थापन शिक्षण संस्थांची संख्या (IIM) वाढली आहे. 8 नव्या IIM सुरु झाल्या आहेत. 7 नवे आयआयटी सुरु झाल्या आहेत. 490 नव्या विद्यापीठांची स्थापना करण्यात आली आहे. कौशल्यविकास योजने अंतर्गत 1.6 कोटी युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. देशात 1.6 लाखापेक्षा अधिक स्टार्टअप सुरु झाले असून, यातून 17.6 नाखापेक्षा अधिक नोक-या तयार झाल्या आहेत.
आयुष्मान भारत योजने अंतर्गत 40.71 कोटी आरोग्य विमा कार्ड तयार करण्यात आले आहे. 9 कोटीहून अधिक लोकांवर या योजनेत मोफत उपचार करण्यात आले आहेत.
17 हजार 750 हुन अधिक ग्रामीण आरोग्य केंद्र सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे दुर्गम भागात वंचितांना आरोग्यसेवा मिळणे सोपे झाले आहे.
. ईशान्य कडील राज्यांच्या विकासावर मोदी सरकारने मोठे लक्ष दिले आहे. या राज्यांमध्ये रेल्वे, रस्ते, विमानतळ, पूल अशा पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतुद केली आहे.
ईशान्यकडील राज्यासाठी मोदी सरकारने 44 हजार 859 कोटी पेक्षा अधिक रकमेच्या 3 हजार 613 विकास योजनांना मंजूरी दिली आहे. गेल्या 11 वर्षात 10 ग्रीनफिल्ड विमानतळांची निर्मिती तयार करण्यात आली आहे. आसाम मध्ये 15 नव्या रुग्णालयांच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 8 रुग्णालये सुरु झाली आहेत. 7 रुग्णालयांचे काम प्रगतीपथावर आहे.


