Saturday, February 21, 2026

लाडक्या बहिणींसाठी कामाची बातमी! सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता सरकारने लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या सहभागातून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात येणार आहे.

या नवीन योजनेबाबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.यामध्ये आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मिळून पतसंस्था सुरु केली जाणार आहे. याबाबत बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, शासनाच्या ८ मार्च २०१९ रोजी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांची नोंदणी प्रक्रिया राबवण्यात आली आहे. यामध्ये महिलांसाठी वार्ड प्रभाग ठिकाणी पतसंस्था स्थापन केली जाणार आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबई येथे ही पतसंस्था स्थापन केली जाणार आहे. ही पतसंस्था स्थापन करण्यासठी सभासद संस्था १ हजार असणे गरजेचे आहे.

या संस्थेच्या नोंदणीवेळा १५ लाख रुपयांचे भांडवल असणे गरजेचे आहे. भांडवल असेल तरच पतसंस्था स्थापन करण्यासाठी परवानगी दिली जाईल. उर्वरित महापालिका ठिकाणी ८०० सदस्य असणे गरजेचे आहे. पतसंस्थेच्या नोंदणीवेळा दहा लाख रुपयांचे भांडवल निश्चित करण्यात आले आहे.त्यामुळे आता लाडक्या बहि‍णींना पतसंस्थेची सदस्य होण्याची संधी मिळणार आहे.लाडक्या बहिणी जूनच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जूनचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारत आहेत. दरम्यान, या महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात कधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles