यशस्वी सापळा कारवाई
▶️ *युनिट – अहिल्यानगर
▶️ तक्रारदार- पुरुष,वय- 58 जिल्हा अहिल्यानगर
▶️ आलोसे- सुधाकर श्रीरंग मुंडे वय 57 वर्ष पद गटविकास अधिकारी वर्ग 1 नेमणूक पंचायत समिती राहुरी राहणार प्लॉट नंबर 68, 69 केशव कुंज रोड श्रीराम चौक ऐश्वर्या नगरी अहिल्यानगर
▶️ लाचेची मागणी. – 10000/- रु
लाच स्वीकारली. – 10000/- रु
▶️ *लाचेची मागणी*दिनांक .
दि. 20/06/2025 रोजी
▶️ लाच स्विकारली-
दिनांक 20/06/ 2025
▶️ * लाचेचे कारण*. तक्रारदार हे सेवानिवृत्त ग्रामसेवक असून त्यांच्यावर गटविकास अधिकारी राहुरी यांच्या अहवालावरून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी निलंबनाची कारवाई केली होती त्यानंतर तक्रारदार हे सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे वरील दोषारोप पत्राचा अहवाल गट विकास अधिकारी यांनी पाठवायचा होता तो अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने पाठविण्याकरिता आलोसे यांनी 10000 रुपये लाचेची स्वतः मागणी करून स्वतः तक्रारदार यांच्याकडून लाच रक्कम स्वीकारलेली आहे
या संदर्भात तोफखाना
पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
▶️ सापळा व तपासअधिकारी
श्रीमती छाया देवरे पोलीस निरीक्षक लाप्रवि, अहिल्यानगर मोबाईल नंबर 8788215086
परिवेक्षण अधिकारी अजित त्रिपुटे पोलीस उपाधीक्षक ला प्र वि अहिल्यानगर
▶️ सापळा पथक
पोलीस नाईक चंद्रकांत काळे पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक ड्रायव्हर अरुण शेख
▶️ *मार्गदर्शक-*1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.


