Saturday, February 21, 2026

मोठी बातमी! लाडक्या बहि‍णींना खुशखबर; 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज, तेही शून्य टक्के व्याजदराने

राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली असून कोट्यवधि महिला या योजनेच्या माध्यमातून शासनाशी थेट जोडल्या गेल्या आहेत. योजनेच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या काहीशा सक्षम बनल्या असून काही महिलांना लहान-सहान उद्योगही सुरू केले आहेत. आता, मुंबईतील या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना चक्क शून्य टक्के दराने 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे. लाडक्या बहि‍णींना मुंबई बँक मदतीचा हात देणार असून लाडक्या बहि‍णींना आता शून्य टक्के व्याज दराने कर्जपुरवठा केला जाणार आहे. लाडक्या बहिणींचे पैसे उद्योग-व्यवसायांच्या माध्यमातून बाजारात आले पाहिजे, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. त्यामुळे, आता लाडक्या बहि‍णींना 9 टक्के व्याजदराने देण्यात येणारा कर्जपुरवठा चक्क शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे, असे मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले. शासनाच्या 4 महामडंळातील विविध योजनांमधून ही सवलत देण्यात आहे.

राज्य सरकारच्या 4 महामंडळाच्या योजना अशा आहेत की, 12 टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा लाभार्थींना दिला जातो. पर्यटन महामंडळाची आई योजना आहे, ज्या योजनेतून महिलेला 12 टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा दिला जातो. यासह, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या विमुक्तांसाठीचं महामंडळ आणि ओबीसी महामंडळांच्या योजनांमधून व्याजाचा परतावा महिलांना दिला जातो. त्यामुळे, आम्ही ज्या महिलांना कर्जपुरवठा करत आहोत, त्या लाभार्थी महिला या योजनेत बसत असतील, तर या महिलांना शून्य टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध होऊ शकतं, असं गणित प्रवीण दरेकर यांनी मांडलं.

मुंबई बँकेकडून महिलांना 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज
एका महिलेला 1 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं, त्यात 5 ते 10 महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चारही महामंडळाचे संचालक व संबंधित खात्याचे सचिव आणि अतिरिक्त सचिव होते, ज्यांसमवेत झालेल्या बैठकीतून या चारही महामंडळाच्या माध्यमातून महिलांना शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्याचा शासन निर्णय झाला आहे, मुख्यमंत्र्‍यांनी तसे आदेशही दिले आहेत, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. मुंबई बँकेकडे अर्ज केल्यानंतर महिलेला 1 लाखापर्यंत कर्ज मिळेल, त्यासाठी व्यवसायाच्या तपासणी केली जाईल. व्याजाचा परतावा आम्ही महामंडळाकडून मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्वयंपूनर्विकास हाऊसिंगचं ज्या पद्धतीने केलं, तसेच हेही सध्या मुंबईतील महिलांना या योजनेचा लाभ मिळेल, त्यामध्ये 12 ते 13 लाख लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी आहेत. तर, 1 लाखांच्या आसपास आमच्या बँकेकडे सभासद आहेत, अशी माहितीही दरेकर यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles