Saturday, February 21, 2026

लाडक्या बहि‍णींना खुशखबर! १५०० नंतर ३००० मिळणार, मुख्यंमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

मध्य प्रदेशातील लाडली बहना योजनेच्या या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी गुरुवारी इंदूरमध्ये घोषणा केली की, त्यांचे सरकार जनतेला दिलेलं प्रत्येक वचन पूर्ण करेल. जाहीरनाम्यात लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीची अंमलबजावणी केली जाईल. यावर्षी दिवाळीपासून लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले जातील. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की मध्य प्रदेश सरकार लाडली बहना योजनेची रक्कम ३००० रुपये करण्यासाठी वचनबद्ध आहे. २०२८ पर्यंत ही रक्कम ३००० रुपये केली जाईल.

लाडली बहणा योजनेबद्दल मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव म्हणाले की, दिवाळीच्या दिवशी लाडली बहणा योजनेची रक्कम १५०० रुपये केली जाईल. २०२६च्या आर्थिक वर्षात ती पुन्हा वाढवली जाईल. २०२८ पर्यंत ही रक्कम ३००० रुपये केली जाईल. पुढे ते म्हणाले की, आम्ही पाच वर्षांत आमचा संकल्प पत्र पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि २०२८च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आम्ही ते पूर्ण करू. १६ जून रोजी जबलपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी लाडली बहणा योजनेचा २५वा हप्ता महिलांच्या खात्यात हस्तांतरित केला. त्यांनी जबलपूरमध्ये अनेक विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन देखील केले.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, काँग्रेस नेत्यांनी विधाने करण्यापूर्वी विचार करावा. काँग्रेस सरला मिश्रा हत्याकांड का विसरली? काँग्रेसने फक्त लाचखोरीचे काम केले. त्यांचे अनेक नेते जामिनावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हे भाजपचे सरकार आहे. आमच्या राज्यात जो कोणी कायदा मोडेल त्याला सोडले जाणार नाही. काँग्रेस नगरसेवक अन्वर कादरी यांच्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, तो दरोडेखोर असो किंवा दरोडेखोराचा बाप, कोणालाही सोडले जाणार नाही. त्यांनी प्रशासनाला अशा गुन्हेगारांना शोधून पकडण्याचे आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

दरम्यान, मध्य प्रदेश सरकारने या योजनेत महिलांना ३००० रुपये देण्याचे वचन दिले होते. त्या दृष्टीने आता सरकार पाऊल उचलत आहे. सरकारने सुरुवातीला १००० रुपये दिले होते. त्यानंतर हे पैसे पाठवून १२५० करण्यात आले आहे. त्यानंतर आता या योजनेचा निधी २५० रुपयांनी वाढवण्यात येणार आहे. सरकार रक्षाबंधनला महिलांच्या खात्यात अतिरिक्त २५० रुपये वाढवणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles