अजित पवारांच्या खात्यावर ‘वॉच’ ठेवा, त्यांच्याकडे ‘इतक्या’ कोटींचे दोन निधी;एकनाथ शिंदेंचे सेना आमदारांना आदेश

अजित पवार निधी देत नाही असा नाराजीचा सूर लावलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांनी आदेश दिला आहे. अजित पवारांच्या खात्याकडे मोठा निधी आहे, त्यावर लक्ष ठेवा. तो निधी कुठे वितरित होतो याची माहिती घ्या असा आदेश एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना दिल्याची माहिती आहे. कॅबिनेटच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची वेगळी बैठक घेतली. त्यामध्ये निधी वाटपावरुन शिंदेंच्या मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याची माहिती आहे.

महायुती सरकारच्या तीन घटक पक्षांमध्ये निधी वाटपासंबंधी सातत्याने धुसफूस सुरू असल्याचं दिसून येतंय. त्यातही शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याविषयी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांची स्वतंत्र बैठक घेतली.

एकनाथ शिंदे निधीवरुन आक्रमक
राज्यातील निधी वाटपावरुन एकनाथ शिंदे आक्रमक झाल्याचं दिसून आलं. अजित पवारांच्या खात्यावर बारकाईनं लक्ष ठेवा असा आदेश त्यांनी मंत्र्यांना दिला. अजित पवारांच्या खात्यात 14-14 हजार कोटींचे दोन निधी आहेत. त्यावर लक्ष ठेवल् पाहिजे. हा निधी कुठे वितरीत होत आहे यांची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे असं एकनाथ शिंदे म्हणाले.

जे आपल्या हक्काचं आहे ते घेतलंच पाहिजे असा आदेश एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना दिला. त्यामुळे आता अजित पवारांच्या अर्थखात्यावर शिवसेनेचा वॅाच असेल अशी चर्चा सुरू आहे.

निधी वाटपाच्या मुद्द्यावरून मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानतंर एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांची भेट घेतली. त्या आधी शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांनीही अजित पवारांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये निधी वाटपावरुन चर्चा झाल्याची माहिती आहे.

अजित पवार आपल्याला निधी देत नाही अशी तक्रार करत शिवसेनेच्या मंत्र्यांनी या आधीही नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली होती. परंतु निधी हा काही आपल्या खिशातून देत नाही, राज्याच्या तिजोरीला शिस्त आणण्यासाठी काही पावले उचलली जातात असं अजित पवारांनी या आधी स्पष्ट केलं होतं.

भाजपच्या मंत्र्यांचीही तक्रार
अजित पवारांच्या निधी वाटपावर फक्त शिवसेनेच्याच नव्हे तर भाजपच्या आमदारांनीही नाराजी व्यक्त केली आहे. अमित शाह नांदेडच्या दौऱ्यावर असताना भाजपच्या आमदारांनी त्यांच्याकडे स्टेजवरच तक्रार केली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles