Sunday, February 22, 2026

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना धक्का ; प्राजक्त तनपुरे यांचे चुलते अरुण तनपुरे आणि त्यांचे सुपुत्र राष्ट्रवादीत

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीतील डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन, तसेच बाजार समितीचे सभापती, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे चुलते अरुण तनपुरे आणि त्यांचे सुपुत्र व कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे यांनी मोठा निर्णय घेतला. मंगळवारी रात्री देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात अधिकृत प्रवेश केला. शरद पवार यांच्यासोबत असलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र आता प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.

नुकत्याच झालेल्या तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत तनपुरेंनी एकतर्फी विजय मिळवत कारखाना ताब्यात घेतला. कारखान्याला नवसंजीवनीची आशा असल्याने सत्तेपासून दूर राहून चालणार नाही, असा समज असल्याने गेल्या काही दिवसांपासून अरुण तनपुरे हे अजित पवार यांच्या गटात सामील होणार असल्याची चर्चा होती, त्याला आता अधिकृत स्वरूप प्राप्त झाले.या प्रवेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आणि राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड यांनी महत्त्वपूर्ण शिष्टाई केली. प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढील आठवड्यात अरुण तनपुरे यांचे समर्थक व स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठा सामूहिक अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याने प्रवेश सोहळा आयोजित केला जाणार आहे. विशेष म्हणजे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे चुलते असलेले अरुण तनपुरे यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने प्राजक्त तनपुरे यांची भूमिका काय असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles