प्रा. शशिकांत गाडे : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी ठाकरे सेना ताकदीने मैदानात उतरणार महाविकास आघाडीच्या जागांवाटपाबाबत लवकरच बैठक
आगामी जिल्हा परिषद , पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तयारीला लागण्याचे आदेश दिले असुन शिवसेना पुर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहे.महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत लवकरच खा. निलेश लंके यांच्या सोबत बैठक घेतली जाईल अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी आज नगर शहरात शिवसेना ठाकरे गटाची बैठक प्रा. गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीस अहिल्यानगर शहर , नगर तालुका , पारनेर तालुका व श्रीगोंदा तालुक्यातील शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थीत होते. या बैठकीस पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणारे आणि महाराष्ट्र धर्मासाठी सज्ज असलेले शिवसैनिक निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्धार या बैठकीत मांडण्यात आला. या प्रसंगी प्रा. शशिकांत गाडे यांनी सांगितले की, शिवसेनेचे ज्या गटात ,गणात व प्रभागात विद्यमान सदस्य व नगरसेवक आहेत त्या जागा शिवसेनेकडेच राहतील. इच्छुक उमेदवारांनी आता निवडणुकीसाठी सज्ज व्हावे. सामान्य जनता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. सकारात्मक विचार ठेवा आणि जिद्द सोडू नका. नगर तालुक्यात पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार आहे.तसेच खा. निलेश लंके यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करून आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीतील जागावाटप निश्चित करणार असल्याचे संकेत गाडे यांनी बैठकीत दिले. शिवसेना आता नव्या जोमाने जनतेसमोर जात असून स्थानिक पातळीवरील प्रश्न, विकासकामे, शेतकरी, तरुण, महिला आणि सामान्य जनतेच्या हितासाठी समर्पित भावनेने काम करणार आहे. या बैठकीस युवा सेनेचे सहसचिव विक्रम राठोड, योगीराज गाडे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत, डॉ. भास्कर शिरोळे, पारनेर तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब दुतारे, रविंद्र वाकळे , पारनेर शहर प्रमुख निलेश खोडदे, युवासेना नगर प्रमुख प्रवीण गोरे ,पारनेर युवासेना प्रमुख अनिल मोटे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख गणेश कुलट ,संदीप गुंड ,प्रवीण कोकाटे आणि डॉ. राम कदम किरण वामन, रा .वि.शिंदे सोमनाथ कांडके, गणेश गुंड, दिलीप शिंदे, रामेश्वर सोलट बाबासाहेब ससे, अरुण ससे डॉ. ससे ,बाबा देशमुख आदि पदाधिकारी उपस्थित होते.


