अहिल्यानगर शहरात युवतीची छेडछाड, भावालाही मारहाण

अहिल्यानगर -शहरातील रामवाडी परिसरात एका युवतीला छेडण्याचा, मारहाण करण्याचा व जिवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला असून याबाबत संबंधित युवतीने तोफखाना पोलीस ठाण्यात सोमवारी (30 जून) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी सलमान सत्तार शेख याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.24 वर्षीय पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती, तिची आई आणि भाऊ हे तिघे मिळून अहिल्यानगर शहरात वास्तव्य करत आहेत. रविवारी (29 जून) रात्री 8.30 वाजता युवती कामावरून घरी परत येत असताना सलमान शेख याने तिला अश्लिल इशारे करून बोलावले. युवतीने त्याच्याकडे दुर्लक्ष करून भावाच्या उपस्थितीनंतरच बोलण्याचे सांगितल्यावर सलमानने ‘तेरे पास मेरा काम है’ असे म्हणत तीला जबरदस्तीने जवळ बोलावले. यावेळी त्याने तिचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले तसेच पोटात बुक्क्यांनी मारहाण केली.

घटनेच्या वेळी पीडितेचा भाऊ धावून आला असता, सलमान याने लाकडी दांडक्याने त्याला मारहाण केली. पीडिताने विरोध केल्यावर सलमानने तिलाही मारहाण केली आणि तुम्ही माझ्या नादी लागु नका, मी तुम्हाला जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार तनवीर शेख करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles