Saturday, February 21, 2026

ढाकणे शैक्षणिक संकुलमध्ये बी.ई/बीटेक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुविधा केंद्रास मान्यता

ढाकणे शैक्षणिक संकुलमध्ये बी.ई/बीटेक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुविधा केंद्रास मान्यता

मौजे राक्षी ता. शेवगाय येथील ढाकणे शैक्षणिक संकुल अंतर्गत समाजभूषण एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शेवगाव या पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष बीई/बीटेक अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र शासनमार्फत प्रवेश सुविधा केंद्रास आज मान्यता देण्यात असल्याबाबतची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. श्रीकांत ढाकणे यांनी दिली आहे. दि.२८/०६/२०२५ ते ०८/०७/२०२५ पर्यंत विद्यार्थी प्रथम वर्ष बी.ई/बी.टेकसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. सदर अजे आणि मूळ कागदपत्रांची पडताळणी सुविधा केंद्रात विनाशुल्क करण्यात येणार आहे. तसेच या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना सर्व ते मार्गदर्शन केले जाणार आहे.

बीई/बीटेक प्रथम वर्षासाठी विद्यार्थी फिजीक्स केमिस्ट्री मॅथ्स विषयांस १२यी शास्त्र उतीर्ण असणे तसेच महाराष्ट्र शासनाच्या सीईटी परीक्षमध्ये नॉनझिरो गुणांकन प्राप्त असणे आवश्यक आहे. खुला प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पीसीएम ग्रुपमध्ये किमान ४५ टक्के (१३५ गुण) तर मागासवगीय विद्यार्थांसाठी ४० टक्के (१२० गुण) मिळवणारे विद्यार्थी प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी पात्र आहेत. ३ वर्षे कालावधीचा पदवीका अभियांत्रिकी म्हणजेच पॉलिटेक्निक उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रथम तसेच थेट द्वितीय वर्षांसाठी प्रवेश मिळतो, यासाठी त्यांना सीईटी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थी डिप्लोमा इंजिनिअरिंग म्हणजेच पॉलिटेक्निक उत्तीर्ण किंवा बीएससी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पॉलिटेक्निक/ बीएस्सी मध्ये उत्तीर्ण गुणांच्या मेरीटनुसार प्रवेश होतात थेट द्वितीय वर्षासाठी खुला प्रवर्ग ४५ टक्के आणि मागास प्रवर्गासाठी ४० टक्के गुण प्राप्त असणे आवश्यक आहे. महा-सीईटी परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. महा-सीईटी व्यतिरिक्त इतर परीक्षा दिली असल्यास खुला प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी रु.१०००/- तर मागासप्रवर्गातील रु.८००/- शुल्क भरणे आवश्यक आहे.

१०/१२वी/पदवी परीक्षा गुणपत्रक, सीईटी स्कोरकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, डॉमिसाईल आणि नॅशनलिटी, उत्पन्न दाखला, ईडब्ल्यूएस (लागू असल्यास), मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्याच्या नावे जातीचा दाखला, ३१/०३/२०२६ पर्यंत वैध असलेले नॉन क्रिमीलेयर आणि जाती वैधता प्रमाणपत्र (फास्ट पॉलिडिटी) असणे आवश्यक आहे. इडब्लूएस उमेदवारांबाबत सदरचे प्रमाणपत्र हे सन २०२५-२६साठी वैध असलेले आणि महाराष्ट्र शासनाद्वारे निर्गमित असणारेच ग्राह्य धरण्यात येईल. केंद शासनाचे ईडब्ल्यूएस विचारात घेण्यात येणार नाही. टीएफडब्ल्यूएससाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांचे स.८ लाखपेक्षा कमी उत्पन्न असणारे मा. तहसीलदार यांनी सन २०२४-२५साठीचे उत्पन्न प्रमाणपत्र अनिवार्य आहे. ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडे ३१/०३/२०२६ पर्यंत वैध असणारे नॉन क्रिमीनिअर प्रमाणपत्र किंवा जाती वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसेल त्या विद्यार्थ्यांनी संबंधित कार्यालयाकडे सदरील प्रमाणपत्र मिळणेकामी सादर केलेल्या पावती जोडून अर्ज भरता येणार आहे. तथापि प्रवेश घेतेवेळेस सदरील प्रमाणपत्र उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द होऊ शकते. म्हणून विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची योग्य ती काळजी घ्यावी.

ढाकणे शैक्षणिक संकुलामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या तंतोतंत अंमलबजावणीच्या अनुषंगाने विद्यापीठाने विकसित केलेला अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. नियमित तासिका आणि प्रात्यक्षिकांबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था प्रयत्नरत आहे. विद्यार्थ्यांना विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक कला गुणांना वाव देण्यात येत आहे. गेस्ट लेक्चर, इंडस्ट्रीयल व्हिसिट, ऑन जॉब ट्रेनिंग, इंटर्नशीप, मायक्रोजेक्ट, सेल्फ लर्निंग, स्पोर्टस इत्यादी माध्यमातून विद्यार्थ्यांना संबंधित विभागातील नवनवीन संकल्पनांची माहिती देण्यात येत आहे. ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध कसन देण्यात येत आहेत.

प्रथम वर्ष नोंदणी प्रक्रिया दि. २८/०६/२०२५ पासून तर थेट द्वितीय वर्षासाठी साधारणतः १२/०७/२०२५ सुरवात होणार आहे संस्थेच्या सुविधा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना नोंदणी करणेकामी सर्व ते सहकार्य करण्यात येत आहे तसेच विद्यार्थी आणि पालक यांचे समुपदेशन करण्यात येत आहे तरी पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्वल करावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मा. एकनाथरावजी ढाकणे, सचिव श्रीमती जया रहाणे, समन्वयक प्रा. ऋषिकेश ढाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. श्रीकांत ढाकणे, प्राचार्य डॉ. आर.एच अत्तार, डॉ.अंबादास डांगरे, प्रा. महेश मरकड यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles