वकील गुणरत्न सदावर्तेंची ही ठाकरे बंधूंवरील टीका ऐकलीत.सदावर्तें त्यांच्या अशा वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. राज्य सरकारने हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द केल्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येऊन विजयी मेळावा साजरा करणार आहेत. मात्र, या विजयी मेळाव्यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली.
हिंदीचा सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर सदावर्ते यांच्या घराबाहेर मनसेकडून जल्लोष साजरा करण्यात आला होता. त्यात गुणरत्न सदावर्तेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवरुन शिवसैनिक आक्रमक झालेत. ठाकरेसेनेचे प्रशांत भिसे यांनी तर वायफळ बडबड करणाऱ्या सदावर्तेंना धडा शिकवण्याची गरज असल्याचं म्हणत सदावर्तेंच्या कानशिलात मारणाऱ्यांला थेट एक लाखाचं बक्षिस जाहीर केलंय.
महायुती सरकारच्या प्रत्येक निर्णयानंतर सदावर्ते सरकारची बाजू मांडताना दिसतात. मात्र यावेळी महायुतीची बाजू मांडताना सदावर्तेंनाच टीकेचा धनी व्हावं लागतयं. त्यामुळे ठाकरे बंधूंसंदर्भातील वक्तव्यानं सदावर्तेंच्या अडचणी वाढणार की सदावर्ते विरोधकांना शिंगावर घेऊन वकिली खाक्या दाखवणार, हे बघणं औत्सुक्याचं असेल


