Saturday, February 21, 2026

हृदयविकाराच्या मृत्यूमध्ये झालेली वाढ करोना लसींशी संबंधित? आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अहवालानं केलं स्पष्ट

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तरूणांमध्ये हृदयविकारामुळे वाढत चाललेल्या मृत्यूंविषयी चिंता व्यक्त केली होती. तसेच तज्ज्ञांची समिती नेमून १० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. यानंतर आता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. करोना लस आणि हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

देशात ४० वर्षांखालील प्रौढांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या प्रमाणामुळे चिंता व्यक्त होत असताना हे निष्कर्ष समोर आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले की, करोनावरील लसीकरण आणि तरूणांमध्ये वाढत असलेले हृदयविकाराचे प्रमाण यात कोणताही संबंध नाही. राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेल्या अभ्यासात जीवनशैली आणि आधीच्या आजारांना मृत्यूसाठी कारणीभूत ठरविण्यात आले आहे.

करोना महामारीनंतर अनेक ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्यामुळे तरूणांचे मृत्यू होत असल्याचे समोर आले. नाचताना, क्रिकेट खेळताना तरूणांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचे व्हिडीओही व्हायरल झालेले आहेत. यामुळे अनेकदा भीती व्यक्त केली जात होती.अचानक कार्डियाक अरेस्टमुळे होणाऱ्या मृत्यूची अनेक कारणे असू शकतात, जसे की, अनुवांशिक, बदललेली जीवनशैली, आधीपासूनच असलेले आजार आणि करोनानंतर आरोग्याशी संबंधित निर्माण झालेले प्रश्न… असेही या निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles